महाराष्ट्राच्या राजकारात नव्या पक्षाची एन्ट्री, लक्ष्मण हाकेंची पत्रकार परीषदेत घोषणा
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एका नव्या पक्षाची भर पडणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ‘ओबीसी जनता पार्टी’ या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. ओबीसींची मोर्चेबांधणी करण्यासाठी नव्या पक्षाची घोषणा करत प्रस्थापितांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी दर्शवली असून लवकरच पक्ष काढणार असल्याचं ते म्हणाले.
बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधतना लक्ष्मण हाके म्हणाले की येत्या काळात ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभेची निवडणुक लढणार असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी भाजपचा डीएनए हा आता ओबीसी राहिलेला नाही आता कारखानदरांचा झाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजपने काही दिवसांपूर्वी फोडाफोडी करीत शिवसेनेचे सहा खासदार फोडले आहेत. आताही फोडाफोडी करण्याची भाजपला गरज नव्हती, मात्र त्यांनी पक्ष फोडला. आता काही गरज नसताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घ्याची तयारी सुरू केली आहे. पक्ष फोडण्याची काय गरज होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
भाजपला सत्तेत जाण्यासाठी एकनाथ शिंदेची गरज होती. मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची काय गरज होती. एकदा तुम्ही ममता बॅनर्जींचा पक्ष फोडता, उरलासूरला उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडता असे हाके म्हणाले. उद्धव ठाकरेंचे खासदार जे फुटले ते भाजपविरोधात निवडून आले आणि तेच परत शिंदेकडे गेले आहेत. भाजपचा डीएनए आता प्रसाद लाड आहे. प्रविण दरेकर आहे, असंही हाके म्हणाले.
सत्ता येत असतात जात असतात मुख्यमंत्री येत असतात जात असतात. पण मी ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय त्याच्या शोषणावर राष्ट्रवादीने काय केले ते मला सांगा, राष्ट्रवादीने कोणता लढा उभारलाय ते म÷ला सांगा असे हाके म्हणाले कारखाने काढले, उद्योगपतींशी साटलोटं केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एक असल्याचही हाके यावेळी म्हणाले.



Comments