top of page

महाविकास आघाडी कायम, एकत्रित निवडणूक लढणार- जयंत पाटील


मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली . त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.



जयंत पाटील म्हणाले की, येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र यावी, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्याबाबतच्या अनेक मुद्यावर उद्ध ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही देाघेजणही निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे आता येत्या काळात जिथे शक्य असेल त्या ठिकाणी एकत्रित निवडणुक लढवणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान महाविकास आघाडी करीत असताना राज्यभरात स्थानिक नेत्यांच्या मताचा विचार करण्यात येणार आहे. त्यांना बाजूला ठेवून कोणताच निर्णय घेण्यात येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबतची आजची चर्चा पूर्ण झाली नाही. त्यामुळे येत्या काळात आणखी एक-दोन वेळा याच विषयावर चर्चा होईल. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर आघाडीबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणखी चर्चा होईल, असे महला वाटते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधी पर्यंत चर्चा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत सर्वच पक्षाचे नेते याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतील, असेही जयंत पाटील म्हणाले.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत प्रशांत जगताप यांनी ऐनवेळी पक्ष सोडून जाण्याने दु:ख झाले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकदेखील लढवली आहे. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही. जगताप यांनी पक्ष सोडून जाण्यापूर्वी माझ्यासोबत चर्चा करायला हवी होती अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Comments


bottom of page