महाविकास आघाडी भूईसपाट होणार आहे; आत्ताच आक्षेप नोंदवा !
- Navnath Yewale
- Aug 11
- 2 min read
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप 51 टक्के मतांनी जिंकणार महसूलमंत्री बावनकुळे यांनी विरोधकांना सुनावले

अमरावती: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे सध्या ‘ खोटं बोला, रेटून बोला’ हेच काम सुरू आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक पक्षाचे बुथ पातळीवरील एजंट असतात. जेव्हा तुम्हाला मतदार यादीवर आक्षेप घेण्याची वेळ होती, तेव्हा तुम्ही ते घेतले नाहीत. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भूईसपाट होणार आहे.
आजही संधी आता मतदार याद्या पाहण्याची वेळ आली आहे. आताच मतदार यादी पुन्हा बघून घ्या, आताच आक्षेप घेऊन टाका, नाहीतर निवडणूक हरल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार यादी चुकीची होती, अशी टीका महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलाताना केली.
अमरावतीच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बानकुळे पुढे बोलताना म्हणाले की, त्यांनी आक्षेप नोंदवला नाही. नाना पटोले फक्त दोनशे मतांनी जिंकले, त्यांनीही आक्षेप घेतला नाही. पूर्ण निवडणूक प्रक्रिया आटोपली, तुमचे आक्षेप नाहीत. आपल्या राज्यात एक लाख बुथ आहेत. यापैकी कोणत्या एका तरी बुथवर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतला का, मतदान झाल्यानंतर जेव्हा मतदान यंत्रे सील केली जातात, तेव्हा कुणी आक्षेप नोंदवले का, एक लाख बुथवरील मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतले का, आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निवडणुक हरले.
आताही निवडणुकीत पराभूत झाल्यावर काय सांगतील की मतदार यादीत गडबड होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या वेळी 2 कोटी 50 लाख मते मिळाली, 31 खासदार जिंकले तेव्हा मतदार यादी बरोबर होती. तेव्हा मतदान यंत्रे बरोबर होती आणि भाजप जिंकली, तर यंत्रे खराब झाली. मतदार यादी खराब झाली. हे उद्योग थांबले पाहिजेत. लवकरच स्थानिक स्वराजय संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भूईसपाट होणार आहे.
भाजपा, महायुती 51 टक्के मतांनी जिंकणार आहे. आजही महाविकास आघाडीच्या नेत्यांना संधी आहे. पुढे म्हणतील की मतदार याद्या चुकल्या निवडणुकीच्या आधी आताच मतदार यादी पाहून घ्या आताच आक्षेप घेऊन टाका. नाहीत उद्या पराभूत झाल्यावर पुन्हा मतदार यादी चुकीची होती, असे म्हणतील. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या आरोप करताहेत, त्यांनी आताच आक्षेप नोंदवावेत. राहुल गांधी यांच्या गुड बूकमध्ये येण्यासाठी या विदर्भातील काही नेते त्यांचा सूर आवळत आहेत. राहुल गांधी यांना या देशाची नाळ कळलेलीच नाही.



Comments