top of page

महिला आयोगाकडे आलेल्या महिलांना खरातकडे पाठवलं? रुपाली ठोंबरेंचे चाकरणरांवर गंभीर आरोप

नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशोक खरातने भविष्य बघण्याच्या नावाखाली शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात राज्य महिला अयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव समोर येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खळबळजनक दावा केला असून महिला आयोगाकडे येणार्‍या महिलांना खरातकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप केला आहे.


अशोक खरात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णीक यांची भेट घेतली. या भेटीनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर याच हे सर्व रॅकेट चालवत होत्या, रुपाली चाकणकर यांना अटक रून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.


“ हे रॅकेट रुपाली चाकणकर चालवत होत्या असे समोर येत आहे.झाशीची राणी प्रतिष्ठानच्यावतीने मी रुपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिर्डी, आर्वीमध्ये जो इतरांवर जो गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या दबावानेच दाखल झाला होता, असा दावाही रुपाली पाटील यांनी केला आहे .


दरम्यान रुपाली ठोंबर पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या गंभीर आरोप करताना म्हटले की, राज्य महिला आयोगाकडे आलेल्या महिलांचे समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करून घ्या, असे बाबा आहेत. असं करून ते प्रकरण वर्ग केलं जात होत, असा दावाही रुपाली ठोंबरेंनी केला. त्यामुळे हे प्रकरण एसआयटीकडे गेलं असलं तरी आम्ही रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे, त्यांनाही आरोपी करणे गरजेचे आहे, अशी मागणी केल्याचंही त्या म्हणाल्या

Comments


bottom of page