top of page

माढ्यातील अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरुन दोन गट भिडलेे !जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज; शिवप्रेमींतून संताप

सोलापूर: जिल्ह्यातील माढातील अंजनगाव खेलोबामध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वादाला तोंड फुटलं आणि त्यानंतर रात्री दगडफेकही झाली. मात्र याच प्रकरणावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज अंजनगावमध्ये तणापूर्ण शांतता आहे.


अंजनगाव खेलोबा गावातील खेलोबा देवस्थानाजळव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला. धनगर समाजाने याला आक्षेप घेतला. यानंतर रात्री पोलिसांनी पुतळा काढण्यासाठी क्रेन बोलवली यानंतर शिवप्रेमी संतप्त झाले. जमावाकडून दगडफेक झाली. रात्री 11:30 पर्यंत हा प्रकार सुरू होता. यामध्ये माढा तहसीलदार यांच्या वाहनावर जोरदार दगडफेक झाल्याने मोठे नुकसान झाले. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून मराठा आणि धनगर समाजात सुरू झालेला वाद रात्री दगडफेक आणि लाठीचार्जपर्यंत गेला.


अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिरा जवळ बसवला आहे. त्यांचा आक्षेप आहे सदर जागा देवस्थानची आहे. तर शिवप्रेमी म्हणतात सरकार जागा आहे. हेच या वादाचे मूळ कारण आहे. काल रात्री पोलिसांनी पुतळा काढण्यासाठी क्रेन आणली आणि पुतळा काढण्यास शिवप्रेमींनी विरोध केल्यानंतर दगड फेक झाली. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी फक्त शिवप्रेमींनाद मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर अंतरवाली सराटीप्रमाणे मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचा अरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंनगाव खेलोबा गावातील खेलोबा देवस्थानाजवळ बसवण्यात आला ती जागा धनगर समाजाची असून परवानगी न घेता पुतळा बसवल्याचरा आरोप धनगर समाजाकडून केला जात आहे. यामुळेच हा पुतळा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.


धनगर समाजाने केलेला दावा मराठा समाजाने खोडून काढला आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यसांचा पुतळा देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे पाटील यांनी पुतळा बसवला ती जागा खेलोबा देवस्थानची नाही, अंस मराठा समाजाचं म्हणणं आहे. बाळराजे आवारे पाटील यांनी या विषयावर बोलताना, “ छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यातीन प्रत्येक गावात परनगी शिवाय बसवणार.द आतापर्यंत 600 पुतळे बसवले कुठे विरोध झाला नाही. लक्ष्मण हाके यसांनी जर छत्रपती शविाजी माहराज यांना विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत मारू,” असा थेट इशारा दिला आहे. पुढे बोलताना बाळराजे आवारे पाटील यांनी, “ शिवरायांचा पुतळा बसवलेली जागा खेलोबा देवस्थानची असली तरी त्यांनी विरोध करू नये, त्यांच्या मुळे आज मंदिरावील कळस सुरक्षित आहेत. आम्ही आज पर्यंत 600 पुतळे परवानगी शिवाय बसवले. यापुढे ही असेच पुतळे बसवणार ” ते म्हणाले.


दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज अंजनगाव येलोबा गावात येण्याचं जाहीर केल्यानंतर सकाळपासून पोलिस बंदोबस्त वाढवला. मात्र, त्यांना पंढरपुरमध्येच पोलिसांनी स्थानबद्ध केले. हाके म्हणाले “ आम्ही छत्रपतींसोबत होतो तेव्हा तुम्ही निजामाची चाकरी करत होता. धनगर समाजाच्या देवस्थानाची विटंबना करण्याचा प्रयत्न दगडफेक करून त्यांनी केला आहे. 70 टक्के समाज असलेल्या गावात कशासाठी दादागिरी सुरू आहे?” अस प्रश्न हाकेंनी उपस्थित केला.


यानंतर मराठा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी “ अंजनगाव खेलोबा येथील वाद लक्ष्मण हाकेमुळे चिघळला. हाकेच्या दबावामुळे पोलिसांनी शिवप्रेमीवर लाठीचार्ज केला.” असा अरोप करत त्यांनी शिवप्रेमींवर लाठीचार्ज करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी डोंगरे यांनी केली आहे.

Comments


bottom of page