मातब्बर नेत्यांची होमपिचवरच गच्छंती!
- Navnath Yewale
- Jul 31
- 2 min read
पक्षप्रवेशाच्या सांगली पॅटर्नचा बीडमध्येही उदय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. एका माजी मंत्र्यांनी दोन मुलांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सांगलीत जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आता बीडमध्येही गेल्या 35 वर्षाची साथ सोडून पंकजा मुंडे यांचे विश्वासू राजाभाऊ मुंडे मुलगा बाबरी मुंडे यांच्या समवेत भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याने सांगली प्रमाणेच मंत्री पकजा मुंडे यांना होमपिचवरच मोठा धक्का मानला जात आहे.
सांगलितील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे हे स्वगृही म्हणजेच भाजपात परतले आहेत. अण्णासाहेब डांगे यांनी पुत्र आणि माजी नगराध्यक्ष चिमण डांगेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, सांगलीत डांगे पिता पुत्रांच्या पक्षप्रवेशाने माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना होमपिचवरच मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी 20 वर्षापूर्वी भाजपची साथ सोडली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच सांगलीत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने राष्ट्रवादील खिंडार पडले असून सांगलीत भाजपची ताकद वाढणार आहे.
सांगली प्रमाणचे बीडमध्येही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. मागील 35 वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या नंतर पंकजा मुंडे यांच्या सोबत असलेले राजाभाऊ मुंडे व त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चिती झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
दरम्यान, राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांचे माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागात चांगलेच राजकीय वलय आहे. मात्र पक्षातून डावलले जात असल्याने राजाभाऊ मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. गेल्या 35 वर्षापासूनची साथ सोडून राजाभाऊ मुंडे व पुत्र बाबरी मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश करीत असल्याने हा मंत्री पंकजा मुंडे यांना होमपिचवरच मोठा धक्का मानला जात आहे.
मागील दहा वर्षापासून पक्षात जिल्हांतर्गत अडचणी निर्माण झाल्या, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. यंत्रणा पहायला माणुस नाही. पक्षश्रेष्टींचही लक्ष नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेला कोण न्याय देवू शकेल, तर स्थानिक आमदार प्रकाश सोळंके, पालकमंत्री अजित पवार हेच न्याय देवू शकतात. त्या अणुषंगाने काल आम्ही मुंबईत अजित दादांची भेट घेतली आहे. दिर्घवेळ चर्चा केली आणि पक्षप्रवेशाचा महूर्त ठरवला. येत्या 7 ऑगस्ट ला वडवणीमध्ये पक्षप्रवेश होईल
राजाभाऊ मुंडे


Comments