top of page

मालेगावात आक्रोश मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांचा कोर्टाचे गेट तोडून आत शिरण्याचा प्रयत्न

आरोपील तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी; कोर्ट परिसरात तणाव

ree

मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.आरोपीला तात्काळ फाशीसह इतर मागण्यांसाठी आज मालेगावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा कोर्टाकडे वळवला. आंदोलनकर्त्यांनी कोर्टाचे गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांच्या शिताफीमुळे पुढील अनर्थ टळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागाल्याने कोर्ट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.



चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी 24 वर्षीय विजय खैरनार या संशयीताला अटक केली आहे. मालेगावापासून 30 किलोमिटर अंतरावरील डोंगराळे गावात ही घटना उघडकीस आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी संशयित खैरनार याला तात्काळ अटक केली. कोर्टाने त्याला यापूर्वी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला मालेगाव येथील अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. आरोपीला हजर करणार असल्याची कुणकुण नागरिकांना लागली. मग नागरिकांनी कोर्टाकडे मोर्चा वळवला. कोर्ट परिसरात मोठ्या संख्येने जमाव जमल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. मात्र, तोपर्यंत आंदोलकांच्या संतापाचा कडेलोट झाला. आरोपीला तब्यात द्यावे अथवा त्याला फाशीची शिक्षा सुनवावी या मागणीसाठी आंदोलक संताप्त झाले. जमाव वाढल्याने त्यांनी थेट कोर्टाचे गेट तोडत आत प्रवेश केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज करावा लागला. तर आंदोलकांनी बंद शटर आणि दुकानांवर राग काढल्याचे दिसून आले.


आंदोलनाच्या दृश्यात सुरुवातील महिलांची मोठी फळी तर त्यापाठोपाठ तरुणांची मोठी फौज जमा झाल्याचे दिसते. सुरुवातीला बंदोबस्तातील पोलिसांनी गेट लावले आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण या घटनेने संतप्त झालेला जमाव जसा वाढला. तसा महिला आणि तरुणांनी कोर्टाचे गेट तोडत आत धाव घेतली. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली.


दरम्यान, पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच आरोपीला कोर्टात थेट आणण्याचे टाळले. पोलिसांनी न्यायालयात आणले असते तर कदाचित नागपूरप्रमाणेच मोठी घटना घडली असती यापूर्वी नागपूरमध्ये महिलांनी कोर्ट परिसरातच गुंडाची हत्या केली होती. तर याप्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी केल्याने वातावरण चांगलेच तापलेले आहे.

Comments


bottom of page