top of page

मुंबई आंदोलनासाठी जरांगे पाटलाचं मराठ्यांच्या नारीशक्तीला आवाहन लाडक्या बहिणींनो हळदी कुंकू घेवून फडणवीस, शिंदेंच्या दारात बसायचं - जरांगे पाटील

अंतरवाली : मराठ आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांचे अंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा मंगळवारी (दि.8) अकरावा दिवस सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांनी मध्यरात्री डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. मुंबई आंदोलनावर ठाम असून दि.12 सप्टेंबर रोजी आता महिलांनी मुंबईत आंदोलनासाठी कूच करायची. लाडक्या बहिणींनी आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दारात हळदी-कुंकू घेवून ठिय्या मांडण्याचं अवाहनही जरांगे पाटील यांनी केलं.


मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि.12 सप्टेंबर रोजी मराठ्यांनी मुंबईकडे कूच करण्याचं इशारा देत जरांगे पाटील यांनी आता मराठ्यांच्या नारीशक्तीला आवाहन केलं आहे. सरकारच्या शिष्ठमंडळाशी चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगे पाटील यांनी पाण्यासह उपचारावर बहिष्कार घातला. जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने राज्यभरातून मराठा बांधव अंतरवालीच्या दिशेन धाव घेत आहेत. गर्दीत महिलांची संख्या वाढत आहे. मागील दोन दिवसात महिलांनी वडीगोद्री येथे धुळे- सोलापूर मार्गावर रास्ता रोको करत सरकारचे लक्ष वेधले होते.


मंगळवारी (दि.8) मध्यरात्री जरांगे पाटलांची प्रकृती खालवल्याने डॉक्टरांच्या सल्याने त्यांनी उपचार घेतले. तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तातडीची बैठक संपन्न झाली. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवालीत येण्याचे संकेत असतानाच मंत्री विखे पाटील यांनी सरकारचे शिष्टमंडळ आता अंतरवालीत जाणार नाही असे वक्तव्य केल्याने जरांगे पाटील संतापले.


रात्री उशीरा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील म्हणाले आता महिलांनी मुंबईकडे निघायचं मुख्यमंत्र्यांची लाडकी दिदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहीणींनी त्यांच्या दारात हळदी-कुंकू घेवून ठिय्या मांडायचा जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उठायचं नाही.


सरसकट महिलांनी आता मुंबईची तयारी करायची घरा घरातून महिला मुंबईकडे निघाली पाहिजे असं अवाहन जरांगे पाटील यांनी केल्याने सरकारची डोके दुखी वाढणार असून महायुती सरकार पुरते कोंडीत सापडलं आहे.

Comments


bottom of page