मुंबई महापालिकेत काँग्रेस- वंचित युती; वंचित 62 जागा लढवणार!
- Navnath Yewale
- Dec 29, 2025
- 1 min read

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतरीची रविवारी घोषणा झाली. मुंबई 227 जागांपैकी वंचित 62 जागा लढणार आहे. तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 10 च्या आसपास जागा सोडून काँग्रेस 150 च्या आसापास जागा लढवणार आहे.
राज्यातील इतर 28 महापालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून तसे अधिकार दोन्ही पक्षाने स्थानिक पातळीवर दिले आहेत. काँग्रेसचे मुख्यालय असेलल्या टिळक भवन मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी या आघाडीची घोषणा केली.
यावेळी काँग्रेसचे नेते सचिन सावंत, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहल सोहनी, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत, संवधिानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. 1998 व 199 च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती, आता 25 वर्षांनी दोन्ही पक्ष एकत्र आले आल्याचेही सपकाळ यावेळी म्हणाले.



Comments