मुंबईच्या देवनारमध्ये अडीच कोटींची रक्कम सापडली, भरारी पथकाची कारवाई; दोन व्हॅनच्या तपासणीतनू रक्कम ताब्यात
- Navnath Yewale
- Jan 5
- 1 min read

मुंबई: राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून वाहतूकीसह राजकीय पक्षांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. निवडणुकांच्या हालचालींवर भरारी पथकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अशातच मुंबईतून मोठी घटना समोर आली आहे. भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून 2 व्हॅनमधून 2 कोटी 33 लाखांची रेाकड ताब्यात घेतली आहे. त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. ही रक्कम कशासाठी आणि कुठून आली याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
निवडणूक अयोगाच्या भरारी पथकाने मुंबईत देवनार परिसरातून दोन व्हॅनमधील 2 कोटी 33 लाख रुपयांची रोकड आज ताब्यात घेतली. ही रोकड एटीएम मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या रकमेबाबत संशय आल्यामुळे या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाकडे सोपवण्यात आला आहे. सध्या ही रोकड देवनार पोलिसांकडे कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रेाकड कुठून कुठे नेली जात होती याची माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, पोलिसांना या रकमेबाबत संशय आहे. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यामुळे पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. यावर बारीक नजर ठेवली जात आहे. संशयित वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. अशातच एका कारवाईत ही रक्कम आढळली आहे. या पैशांची पुढील चौकशी आयकर विभाग करत आहे.देवनार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली असून पुढील तपास सुरू आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईस राज्याच्या विविध भागात सध्या भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच प्रमुख शहरांच्या प्रवेशद्वारावर नकाबंदी करण्यात आली असून शहरात प्रवेश करणार्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. मतदानाच्या आणि प्रचाराच्या काळात राजकीय पक्षांकउून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होण्याची शक्यता आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, बेकायदा गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.



Comments