top of page

मुंबईत 45 हजार शासकीय निवास्थाने बांधणार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्यालयासाठी भूखंड महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच निकाल लागले आहेत. त्यात बहुतांश महापालिका भारतीय जनता पार्टीनं वर्चस्व राखले आहे. या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी 45 हजार शासकीय निवास्थाने बांधली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.


अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1 हजार 901 पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्याक्रम, नक्षलवाद विशेष कृति आराखडा कक्ष यांच्या कार्यालयांसाठी आवश्यक, अधिकारी, कर्मचार्‍यांचा सुधारित आकृतीबंध (नियोजन विभाग) मुंबईतील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांना शासकीय निवास्थाने उपलब्ध होणार. मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी. मुंबई शहर व उपनगरातील पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी 45 हजार शासकीय निवास्थाने बांधली जाणार (गृह विभाग)


अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. वाहनधारकांना दिलासा (नगर विकास विभाग)


मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा -2 (एमयुटीपी-2) साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी (नगरविकास विभाग), तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ (नगरविकास विभाग), पीएम-ई ड्रायव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एक हजार ई-बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता. पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट डेबीट मॅन्डेंट (डीडीएम) द्वारे संबंधित कंपन्यांना खर्चाची रक्कम मिळणार (नगर विकास विभाग)


भाजीपाला निर्यातीकरिता शेतकर्‍यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिवंडी) येथे सर्वोपयोगी-मल्टी मॉडेल हब टर्मिनल मार्केटची उभारणी. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला 7 हेक्टर 93.80 आर जमीन उपलब्ध करून देणार. व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लँट विकीरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे-भाजीपाला साठवणुकीकरिता सुविधांची उभारणी (महसूल विभाग)

यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4 हजार 775 कोटींची मान्यता. प्रकल्पामुळे पाच तालुक्यातील 52 हजार 423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी (जलसंपदा विभाग)


राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता आणि क्षमता संस्था ( महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलीटी अँण्ड अँडव्हान्समेंट्स-महिमा) स्थापन करण्यास मंजुरी. प्रशिक्षित, कुशल युवकांना जगभरातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी समन्वय व अंमलबजावणीसाठी संस्था काम करणार (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यात विभाग)


अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथील भूखंड देण्यास मान्यता महामंडळाला मुख्यालयाची व बहुउद्देशीय इमारत उभी करता येणार (नगरविकास विभाग)

Comments


bottom of page