मुंबईत भर रस्त्यावर तरुणाकडून गोळीबार: नागरिक दहशतीखाली, परिसरात खळबळ
- Navnath Yewale
- Jan 18
- 1 min read

मुंबई: महापालिका निवडणुका होऊन काही तास उलटताच गोळीबाराची घटना घडली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच भागात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत शहरात भररस्त्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. लोखंडवाला बँक रोड परिसरामध्ये अज्ञांताकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरलं आहे. गोळीबार करणारे तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
गोळीबाराची माहिती मिळताच ओशिवरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ओशिवरा पोलिस घटनास्थळी दाखल होऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आणि प्रत्यक्षदर्शींची बोलून घटनेची माहिती घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळावर दोन बुलेट सापडल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार केलेल्या इमारतीला घेरलं. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. गोळीबार करणारे तरुण कोण होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. तर तरुणांनी गोळीबार का केला, याचेही कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. या गोळीबारामागे कोणत्या गँगचा हात आहे का? हे तपासले जात आहे.
अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. परंतु या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर नागरिक दहशतीत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.



Comments