मुंबईत माराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार, मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तरच मिळेल!
- Navnath Yewale
- 5 days ago
- 1 min read

मुंबई: महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही, ते ही मुंबईत, विश्वास बसणार नाही. पण होय हे खरं आहे, मुंबईच्या उपनगरातील भाईंदर परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माच्या नावे घेत तसेच जात समल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे.
भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन प्रकल्पात रवींद्र खरात हे फ्लॅट खरेदीसाठी गेले होते. मात्र, “मारवाडी जैन किंवा ब्राम्हण असाल तरच फ्लॅट मिळेल” असे सांगत जात विचारून सरळ नकार दिल्याचा आरोप रवींद्र खरात यांनी केला आहे. तसेच आहार पद्धती विचारण्यात आली. असा दावाही खरात यांनी केल.
रवींद्र खरात भाईंदर (पश्चिम) येथील श्री स्कायलाइन प्रकल्पात फ्लॅट खरेदीसाठी प्रथम जात विचारण्यात आली, त्यानंतर आहार खान-पान यावरून चौकशी केली गेली. जात विचारल्यानंतर सरळ नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप खरात यांनी केला आहे. अनुसूचित प्रवर्गाृतील असल्याचे कळताच भेदभाव केल्याचा खरात यांचा आरोप आहे. हा प्रकार संविधानातील कलम 14-15 बीएनएस 2023 आणि अनुसूचित जाती, अनुसूचीत भटक्या जमाती अत्याचार कायद्याचे सरळ उल्लंघन आहे. या विरोधात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री आणि पोलिस आयुक्तालय अशा अनेक अधिकार्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करणार “ घटनात्मक अधिकारासाठी माझा लढा सुरूच राहील” असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
घाटकोपरमध्ये मराठी- गुजराती वाद
काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटला होता. इथल्या एका सोसायटीत चार मराठी घरं आहेत. तर संपूर्ण इमरात गुजराती आहे.. गुजराती रहिवाशी मराठी कुटुंबाला त्रास देत असल्याचा अरोप करण्यात आला होता. तुम मराठी लोग गंदा है.. मच्छी मटण खाते हो म्हणत त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. मराठी माणसाला खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर मनसेनं सोसायटीत जाऊन गुजरातींना दम दिला.



Comments