top of page

मुंबईत सीजेपीचे ‘ लहरा दो तिरंगा’ आदोलनाला प्रतिसाद; आंदेालनास मुंबई पोलिसांची परवानगी

5 hours ago
1 min read

मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे परवानगीशिवाय तिरंगा फडकवण्याच्या आरोपावरून सीजेपीचे आशुतोष रांका, सौरव दास यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना पाठिंबा देण्यासाठी सीजेपी कडून देशव्यापी ‘ लहरा दो तिरंगा’ आंदेालनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आलं.


सीजेपी प्रमुख अभितीत दिपके यांनी या देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ तसेच या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. मुंबईतील आंदोलनास अटी,शर्थीवर पोलिसांनी परवानगी दिली.


दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात सकाळी 10 : 00 वाजता ‘ लहरा दो तिरंगा’ आंदोलनास सुरूवात करण्यता आली. कायदा सुव्यवस्थचा प्रश्न निर्माण होवूनये म्हणून मुंबई पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. सीजेपीचे कार्यकर्ते हाता तिरंगा घेवून आझाद मैदाना दाखल झाले. आझाद मैदानाचं एकाच गेट प्रवेशासाठी ठेवण्यात आलं होतं. सुरुवातीला सीजेपीचे कार्यकर्ते आझाद मैदानातील एका कोपर्‍यात गोळा होवून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, प्रचंंड घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी हातातील तिरंगा उंचावत भारत माता की जय, इन्कलाब झिंदाबाद च्या घोषणा दिल्या. शिवसेना (उबाठ), मनसेचाही या आंदोलनास पाठिंबा मिळाला.


एक नागरिक म्हणून आंदोलनात सहभागी: मनसेचे संदिप देशपांडे यांनीही हातात तिरंगा घेवून आंदोलनात सहभाग घेतला. मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर भारतीय नागरिक या नात्याने या आंदोलनात सहभागी झालो आहे. देशात तिरंगा फडकवणं गुन्हा होत आहे. याचा अर्थ हूकमशाही मोदी सरकारची सत्तापालट होणार आहे. प्रत्येकाने या आंदेालनात सहभागी होण्याचं अवाहनही यावेळी संदिप देशपांडे म्हणाले.


Comments


bottom of page