top of page

सीजेपीच्या ‘ लहरा दो तिरंगा’ रॅलीच्या आधीच अभिजीत दिकपे, नेहा बोरा यांनाही पोलिसांनी घेतल ताब्यात.

7 hours ago
1 min read

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये होणार्‍या ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीच्या अधीच दिल्ली पोलिसांनी कठोर भूमिका धेत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी तब्यात घेतलं. कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा उपाययोजना आणि परिसरता लागू केलेल्या निर्बंधचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचललं.


कनॉट प्लेस येथील सेेंट्रल पार्कपासून ‘ लेहरा दो तिरंगा’ रॅली काढण्याच्या तयारीत होते. सीजेपीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते जमले. या रॅलीच्या माध्यमातून सार्वजनिक निषेध आणि शांततापूर्ण निदर्शन करण्याचा त्यांचा दावा होता. मात्र, रॅली सुरू होण्यापूर्वीची, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं. गेल्या दहा दिवसांपासून अभिजीत दिपके यांना ताब्या घेण्याची ही दुसरी वेळ आहे.


अभिजीत दिपके यांच्या नंतर ऑल इंडिया असोसिएशनच्या (आयसा) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. नेहा बोरा यांना मंडी हाऊसजळव पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या मंडी हाऊसपासून सेंट्रल पार्कच्या दिशेनं पायी जाण्याचा प्रयत्न करत होत्या. तर नेहा बोरा यांना ताब्यात घेत असताना अयसाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबीजी केली.


दरम्यान, रॅलीचे गांभीर्य लक्षात घेत आणि ल्युटियन्स दिल्लीचे मुख्य व्यवसायिक केंद्र असलेल्या कनॉट प्लेसमध्ये व्यत्यय टाळण्यासाठी, प्रशासनानं आधीच खबरदारीचं पाऊल उचललं. सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेची चिंता लक्षात घेऊन, नवी दिल्ली महानगरपालिकेनं सेंट्रल पार्क दोन दिसांसाठी लोकांसाठी आणि सर्व प्रकारच्या उपक्रमांसाठी पूर्णपणे बंद केलं.


स्थानिक पोलिस प्रशासनानं या परिसरात लागू असलेल्या भारतीय नागरी सेवा संहितेच्या (बीएनएसएस) कमल 163 चा देखील हवाला दिला. पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं की, या परिसरात कोणत्याही अनधिकृत मिरवणुकीला, जमावाला किंवा निदर्शनाला परवानगी नाही. दरम्यान, सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता, शांतता राखण्यासाठी कनॉट प्लेस आणि असपासच्या परिसरात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते.

Comments


bottom of page