मुंबईमध्ये मेगा रॅम ऋण वितरण,लोकसंपर्क शिबीर संपन्न ग्राहकांना ऋण मंजुरीपत्रांचे वाटप; इंडियन बँकेचे कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन
- Navnath Yewale
- 20 hours ago
- 2 min read

मुंबई : देशाची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक, इंडियन बँकेने क्षेत्र महाव्यस्थापक कार्यालय, मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी, ज्याचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांमध्ये पसरलेला आहे.एका मेगा रॅम ऋण वितरण व लोकसंपर्क शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.
इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचाल आणि मुख्य कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालय मुंबईच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील ग्राहक मान्यवर तसेच अधिकारी प्रत्यक्ष वर्चुअल स्वरुपात उपस्थित होते.
आयोजित शिबीरामध्ये ‘रॅमच्या क्षेत्रात आपले कार्यक्षेत्र मजबूत करण्याबरोबरच, बँकेच्या रणनितीगत उद्देशासह ग्राहक केंद्रित बँकिंगला चालना देऊन व देशाच्या आर्थिक विकासात सहयोग देऊन एका सर्वसमावेशक वृद्धीचा भाग बनण्यासाठी सुरू केला आहे.
मान्यवरांच्या उपस्थित विभिन्न रॅम क्षेत्रांतर्गत ग्राहकांना एकूण 1,048 करोड रुपयांची ऋण मंजूरीपत्रे वितरित करण्यात आले. यामध्ये 634 करोड रुपयांचा मुख्य वाटा एमएसएमई क्षेत्राचा हेाता, ज्यामुळे एमएसएमई सेक्टरच्या वाढीमध्ये सहाय्यक बनून उद्योजकांना सशक्त बनवण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट होतो. ग्राहकांच्या विविध आर्थिक आवश्यकतांच्या पूर्तीसाठी रिटेल आणि कृषी क्षेत्रांतर्गतचेही मंजूरीपत्र वितरीत करण्यात आले.
यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यपालक अधिकारी श्री. बिनोद कुमार यांनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी बँकेच्या दृढ वचनबद्धतेवर जोर देत रॅमच्या क्षेत्रात बँकेच्या वेगवेगळ्या परिवर्तनात्मक उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसचे रिटेल, कृषी आणि एमएसएमई क्षेत्रांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात ऋण सहायता उपलब्ध करण्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. जी क्षेत्रे संपूर्ण देशात रोजगार निर्मिती तसेच आर्थिक विकासात महत्वाची भूमिका निभावतात या बद्दलीही त्यांनी इतंभूत माहिती दिली.
त्याचबरोबर ग्राहकांसह विभिन्न कार्यालयांतून वर्चुअल रुपाने उपस्थिीत सहभागी नागरिकांसमवेत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यपाल अधिकारी यांनी व्यापक पारस्पारिक चर्चा केली. त्यांनी बँकेच्या ग्राहकांच्या बँकेसोबत असलेल्या निरंतर संबंधाची आणि बँकेवर दाखवलेल्या विश्वासाची प्रशंसा करत, लोकसंपर्क उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणार्या शाखांतील व क्षेत्रातील अधिकार्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
दरम्यान, आयोजित सफल मेगा रॅम वितरण, लोकसंपर्क शिबिरास बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यपाल अधिकारी यांच्या दुरदर्शी नेतृत्वासह सुयोग्य मार्गदर्शनाने वित्तीय वर्ष 2026-27 साठी एक सशक्त व उत्साहवर्धक पैलू प्रदान केला आहे.
मुंबईचे क्षेत्र महाव्यवस्थापक कार्यालय, मजबूत ग्राहक सेवेसोबतच, केंद्रित व्यावसायिक लोकसंपर्काच्या माध्यमातून ग्राहक संबंधांना अधिक दृढ करून, व्यवसाय वाढीच्या या प्रवृत्तीला टिकवून ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेप्रति जागरुक असल्याच्या भावना यावेळी व्यक्त झाल्या.



Comments