मुंबईसह देशाच्या राजधानीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट!दिल्लीत 9 जणांना अटक; अरोपींकडून अत्याधुनिक शस्त्र, संशयित साहित्य ताब्यात दिल्ली पोलिसांची कारवाई
- Navnath Yewale
- 43 minutes ago
- 1 min read

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. दिल्लमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर मुंबई शहरदेखील होते.
दिल्ली पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. त्यांचा दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यांनी मुंबईतील दादर तसेच इतर परिसराची रेकी केल्याचीही माहिती आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी आहेत. ते पाकिस्तानातील शहजाद भट्टी याच्या संकपर्कात असल्याचेही समोर आले आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
दरम्यान, आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यात पोलिसांना 9 जणांकडे अनेक संशयित साहित्य अढळून आले. यामध्ये दिल्ली, मुंबईतील अनेक ठिकाणचे व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमध्ये दादर रेल्वे स्थानकाचेही व्हिडीओ आहेत. मुंबईतील अनुउर्जा केंद्र, विमानतळ, रेल्वेस्टेशन, विजनिर्मीती केंद्र टार्गेटवर होते. त्यांच्याकउे ग्रेनेड तसेच अनेक अत्याधुनिक शस्त्र सापडली आहेत.
तपास यंत्रणा अलर्ट मोडवर: हा कट उधळल्यानंतर आता दिल्ली, मुंबईतील पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पोलिसांकडून तपरास यंत्रणेला अलर्ट राहण्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीत पकडण्यात आलेल्या 9जणांची कसून चौकशी केली जात असून दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का? हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.



Comments