top of page

मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

नांदेड: मुखेड तालुक्यातील आज (दि.11 फेब्रूवारी2026) दुपारी 3:25 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता धक्यांची नोंद झाली असून याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंदविण्यात आली आहे. नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांना आज दुपारी 3:25 वाजता भुकंपाचे तीव्र धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदु नांदेडच्या मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ असल्याचे समजले. दरम्यान, हा अतिसौम्य प्रकारचा धक्का आहे या धक्क्यामुळे कुठलीही जीवीत व वित्त नाही झाली नसल्याबाबत तहसीलदार मुखेड यांनी जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास कळविले आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरीत दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर तात्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत जाऊन थांबावे. शिवाय तातडीने प्रशासनाला (02462-235077) या क्रमांकावर संपर्क करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Comments


bottom of page