मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांची भेट
- Navnath Yewale
- Dec 3
- 2 min read

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुक प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या शिवाय काल मतदाना वेळी अनेक ठिकाणी राडा झाला. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
मु÷ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांची एका खासगी कार्यक्रमात त्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 20 निनिटं चर्चा झाली. या भेटीदरम्यान गप्पा मारत असतानाचा दोघांचा फोटो समोर आला आहे. या भेटीवेळी भाजपचे नेते आशिष शेलार देखील उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाचे लग्न मंळवारी रात्री पार पडले. या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या लग्नाला मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस हे दखील उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. दोन्ही नेते हसत, निखळ मनाने चर्चा करत होते. यावेळी आशिष शेलार हे देखील त्यांच्यासोबत होते.
संजय राऊत यांना गंभीर आजार झाला असून ऑक्टोबरमध्ये त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याची माहिती दिली होती.
आराजारवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. हे उपचार सुरू असतानाच एका महिन्यानंतर संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपचाराचा एक महिना पूर्ण झाला असून आणखी एक महिना उपचार सुरू राहणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही तरी बिनसले असल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही नेत्यांमधील दुरावा वाढला आहे. अशातच आता फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीची बातमी समोर आली आणि त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. संजय राऊत हे नेहमी शिंदेसेनेवर टीका करत असतात. आता फडणवीस आणि राऊत भेटीवर त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.



Comments