top of page

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, गैरसमज करून घेऊ नये - मंत्री विखे पाटील

ना.भुजबळांच्या टीकेला मंत्री विखेचं शेलक्या शब्दात प्रत्यूतर

ree

बीडमध्ये शुक्रवारी ओबीसींच्या एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. विखे आले आणि संपूर्ण महाराष्ट्रात विखारा पसरून गेले, गेले तर गेले जीआर पण काढल्याचे भुजबळ म्हणाले होते. भुजबळ यांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेलक आणि मार्मीक प्रत्यूत्तर दिले आहे.


बीड येथील ओबीसी एल्गार सभेतील मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझी भूमिका स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विषय सोडवला आहे.

भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी मराठा वातावरण कधी वाटलं नाही. आता सध्या कोर्टात पाच जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता दिवाळी साजरी करत आहोत, ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का? असा सावाल उपस्थित करत विखे पाटीलांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्याचा पुरावाच भुजबळांकडे मागितला.


पुढे बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, आमच्या डिएनएमध्ये ओबीसी आहे, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, कायद्याच्या चौकटीत बसून मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे. भुजबळांना भेटणार आहे, आणि त्यांना समजून सांगणार आहे. सोबत न्यायमूर्ती शिंदे यांना पण घेऊन जाणार आहे. ते त्यांना सगळं समजून सांगतील, आणि त्यांचा गैरसमज दूर केला जाईल असंही मंत्री विखे पाटील म्हणाले.


जरांगे पाटील यांनी प्रमाणिकपणे आंदोलन चालवलं. त्यांनी निस्वार्थीपणे आंदोलन केलं आम्ही जे काही केलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून विषय मार्गी लावला आहे. तुम्ही त्यांच शिक्षण काढत आहात हे चुकीच आहे, या पुढार्‍यांना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे. दिवाळी संपल्यावर ओबीसी नेत्यांना बोलावणार आणि न्यायमूर्ती शिंदे यांना बोलावून त्यांना विषय समजावून सांगणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page