रक्ताने हात भरलेल्यांनी, माझ्यावर, माझ्या जातीवर बोलू नये; माझ्या नादी लागू नका, लय बेकार होईल- जरांगे पाटलांचा कोणाला इशारा
- Navnath Yewale
- Oct 3
- 2 min read

जालना: काल दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुंडे बंधु भगिनींवर सडकून टीका केली. सारवगाव येथील भगवान भक्ती गडावरून मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा पण मागच्या दाराने आमच्या ताटातून कोणी घेत असेल तर ते मान्य नसल्याचे सांगत एक प्रकारे मराठा आरक्षण समाजास ओबीसीतून आरक्षणास विरोध दर्शिवला.
छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाना साधला. दरम्यान धनंजय मुंडे यांना थेट राजकारण संपवण्याचा इशारा दिला. दरम्यान, धनंजय मुंडे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिलं, याचा आनंद आहे. पण ओबीसीमधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवं? असा प्रश्न विचारताच जरांगे पाटील म्हणाले की, “ तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायच, कशाला घेतलं? कशाला लोकांच्या काड्या करतो. मला काय बोलतो हेकन्या, आम्ही ओबीसीच खातो, मग तू बंजारा समाजाच का खातो? तू दिसतो का त्यांच्यासारखा? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
“ तू माझ्या नादी लागू नको. त्याला एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नका. शहाणपणा करायचा नाही. दादा फादा मी मोजीत नसतो, रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्यावर, माझ्या जातीवर बोलायचं नाही. माझ्या नादाला लागला तर दोघांचा बाजार उठवेन. छक्के- पंजे माझ्यासोबत खेळू नको. तुझ्यामुळे अजित पवाराचा पण कार्यक्रम लावीन. मी जातीला कट्टर मानणारा आहे. ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचा नाही. तो ज्याच्या प्रचाराला जाणार, ज्या सीट पाडणार” असा इशराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान. पंकजा मुंडे यांच्या, आमच्या ताटातलं घेऊ नका या वक्तव्यावर जरांगे पाटील म्हणाले की, “ तुम्ही लोकांच्या ताटातलं ओरबाडून खाता. तुम्ही ज्ञान शिकवता, तुम्ही बिचार्या त्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या. लोकांच वाटोळं केलं, काय ज्ञान शिकवता? “ लक्ष्मण हाकेंवर प्रश्न विचारताच, असे प्रश्न मला नका विचारु, मी त्यांना मोजीत नाही’ असंही जरांगे पाटील म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी कट ऑफ लिस्ट सांगितली. त्यावर मनोज जरांगे आक्रमकपणे बोलले. “ तू किती हुशार आहे माहित आहे, तुला पुन्हा एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको. शहणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करून टाकेन. राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल. लय बेकार होईल, मराठा संपवून टाकतील. त्यांनाही पाडतील. मराठे हुशार झालेत. आता मराठ्यांनी कडवट रहायचं. आता हा ज्याच्या प्रचाराला जाईल त्याला पाडायचं, मग तिथे मराठ्याचा असला तरी गय करायची नाही.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी सन 1994 च्या जीआर विरोधात निवेदनं देण्याचे आवाहनही केले. मी 1994 च्या जीआर विरोधात तक्रार करणार आहे. मराठ्यांनीही आता कलेक्टरकडे 1994 च्या जीआर विरोधात निवेदन द्या, ही एक मागणी मंडल आयोगा लागू झाल्या नंतर ज्या जाती तत्सम, समान शब्दाने आरक्षणात घातल्या, त्यावर तक्रार दाखल करा यासह आदी मुद्यांना हात घालत जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आवाहन केले.



Comments