top of page

रशिया- युक्रेन यद्धावर पीएम मोदी पुतिन यांची चर्चा, युद्धाला पुर्णविराम मिळणार?


नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (दि.5) दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले. यादरम्यान, पुतिन यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्टपणे भाष्य केले. रशिया आता अमेरिकेसह अनेक देशांसोबत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी शांततामय पर्यायांवर विचार करत असल्याची प्रतिक्रिया पुतिन यांनी दिली.


बैठकीदरम्यान पुतिन म्हणाले की, युक्रेन प्रकरणावर भारताने नेहमीच गंभीर, संतुलित आणि जबाबदार भूमिका घेतली आहे. आम्ही भारताच्या या भूमिकेला खर्‍या अर्थाने महत्व देतो आणि याला शांती प्रक्रियेतील सारात्मक योगदान मानतो.

पुतिन यांनी भारत- रशिया संबंधांबाबत म्हणाले की, हे नाते फक्त ऐतिहासिक नाही तर, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे गेल्या काही वर्षात अधिक मजबूत आणि आधुनिक झाले आहे. आता दोन्ही देशांनी उच्च- तंत्रज्ञान, अवकाश क्षेत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या पिढीच्या तंत्रज्ञानांमध्ये सहाकय वाढवले आहे. ही भागीदारी केवळ कूटनीती नाही, तर खर्‍या प्रगतीचे प्रतीक आहे.


रशिया-युक्रेन युद्धावर पीएम मोदींची प्रतिक्रिया : युक्रेन संकटानंतर आमचा सतत संवाद सुरू आहे. एक खरा मित्र म्हणून, तुम्ही आम्हाला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली. माझा असा विश्वास आहे की, विश्वास ही एक महान शक्ती आहे. जगाचे कल्याण केवळ शांततेच्या मार्गानेच होते. एकत्रितपणे, आपण शांततेचे मार्ग शोधले पाहिजेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे, मला विश्वास आहे की पुन्हा एकदा जग शांततेकडे परत येईल, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान या बैठकीतील सर्वाधिक महत्वाचे विधान म्हणजे, रशिया आता अमेरिका सोबतही संवाद करत आहे, हे पुतिन यांनी उघडपणे मान्य केले. या भेटीतून मिळालेल्या संकेतानुसार, युक्रेनबाबत मोठ्या देशांमध्ये संवाद साधला जात असून, रशियाची भूमिका आता अधिक लवचिक होत असल्याचे दिसत आहे. तज्ञांच्या मते, पुतिन यांची टिप्पणी भावी शांती चर्चेचा पहिला मोठा टप्पा ठरू शकते.

Comments


bottom of page