top of page

राजुरी- चिंचपूर मार्गालगत विहीरीच्या काठावर मालवाहू ट्रक उलटला सुदैवाने कठड्यामुळे हानी टळली; नागर्‍याचीवाडी शिवारातील घटना

बीड: राजुरी(न)- चिंचपूर मार्गावर नागर्‍याचीवाडी शिवारात लगतच्या सिंचन विहीरीच्या काठावर मालवाहू आयशर पलटी झाल्याची घटना सोमवारी (दि.30) घडली. चालकाचे प्रसंगावधान आणि विहीरीच्या कठड्यामुळे जीवीत हानी टळली असली तरी, मागील धुलीवंदनाच्या दिवशी याच ठिकाणी चार चाकी वाहनाच्या अपघातामध्ये एकास जीव गमवावा लागला होता. मार्गालगत असलेल्या विहीरींवर जाळीचे अच्छादन, उंच कठडे यासह संरक्षण भिंत यासह विविध सुरक्षेच्या उपाय योजनांची गरज असताना जबाबदार यंत्रणा मोठ्या दुर्घटनांची वाट पाहतेय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.


राज्यात महामार्ग, राज्यमार्गांच्या नवनिर्मिण प्रसंगी लगतच्या सिंचन विहीरींचे पुनर्वसन अथवा पर्यायी उपाय योजनां बाबत निष्काळजीपणा दाखवला जात आहे. या असुरक्षित विहीरी वाहनधारकांसाठी अक्षरश: ‘ मौत का कुआ’ ठरत आहेत. हा मुद्दा अत्यंत गंभीर असून रस्त्यांचे नियोज, संरक्षण, आणि रुंदीकरण करताना संबंधित शासकीय यंत्रणा आणि कंत्राटदारांकडून सिंचन विहीरींची सुरक्षा आणि पुनर्वसनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जबाबदार यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे वाहनधारकांसह अनेकांना जिव गमावा लागला आहे. महामार्गाच्या नवनिर्माण प्रक्रियेत लगतच्या साधनांचे ट्रक्चरल ऑडिट करून अपघातसद़ृष्य साधनांचे पुनर्वसन पर्यायी उपाय योजना अनिवार्य आहेत, मात्र जबाबदार यंत्रणेच्या जाणिवपूर्वक निष्काळजीपणामुळे महामार्गालगच्या सिंचन विहीरी वाहन धारकांसाठी ‘मौत का कुआ ठरत’ आहेत.


महामार्ग आणि रस्ते विकास महामंडळ किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून रस्ता रुंदीकश्रण व नवनिर्माण होताना रस्त्याला लागून असलेल्या सिंचन विहीरी बुजवणे, त्यांचे पुनर्वसन करणे किंवा पर्यायी उपाय योजना करणे अनिवार्य आहे. परंतु या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे वाहन प्रवासादरम्यान दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागतात. प्रत्यक्षात अशा भिषण दुर्घना घडल्यानंतर जिल्हाधिकारी पातळीवर समिती नेमून सर्वे करण्याचे आदेश दिले जातात. मात्र, या कागदी घोड्यानंतर ठोस आणि कायमस्वरुपी उपाययोजना होताना दिसत नाहीत.

वाढत्या जनाक्रोशानंतर प्रशासन गंभीर झाले असले तरी अशा विहीरींबाबत निष्काळजीपणा करणार्‍या कंत्राटदारांवर आणि सबंधित विभागाच्या अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. पण खबरदारीच्या उपाय योजनांमात्र कायम बगल देण्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.


या जीवघेण्या विहीरींच्या समस्येवर मात करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने तातडीने सुरक्षीततेसाठी पावले उचलणे अवश्यक आहे. रस्त्यालगतच्या सर्व सिंचन विहीरींना किमान पाच फूट उंच मजबूत काँक्रीट /दगडी संरक्षण भिंत, विहीरींच्या वरच्या भागतात लोखंडी जाळ्या किंवा स्लॅब बसवून त्या पूर्णपणे बंदीस्त करणे, रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांना लांबूनच विहीरींची माहिती मिळावी यासाठी रात्रीच्या वेळी चमकणारे धोक्याचे फलक लावणे, रस्ता आणि महामार्गांच्या लगत असलेल्या धोकादाय विहीरींचे स्ट्रक्चरल व सेप्टी ऑडीट करून आवश्यक त्या उपाय योजना करणे. दरम्यान अपघात टाळण्यासाठी चाहन चालकांना सतर्कता बाळगणे जितके आवश्यक आहे तितकेच किंवा त्याहून अधिक रस्त्यांची निर्मिती करणार्‍या जबाबदार यंत्रणांनी मानवी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.


नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहीरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथेही सातारा जिल्ह्यातून देवदर्शनाहून परतणार्‍या पंढरपूर तालुक्यातील भाविकांचा टॅम्पो रस्त्याशेजारील विहीरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला होता.


राजुरी (न)- चिंचपूर मार्गावर सोमवारी (दि.30) बीडहून आहिल्यानगर कडे जाणार्‍या एक मालवाहू ट्रक नागर्‍याचीवाडी शिवारात चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यालगच्या विहीरीच्या काठावर पलटी झाला. सुदैवाने चालकाचे प्रसंगावधान आणि विहीरीच्या कठड्यामुळे जीवीत हानी झाली नाही मात्र, अपघाताचे दृष्ट्य आंगावर शहरे आणणारे होते. दुर्घटनाग्रस्त ट्रक अवघ्या विहीरीच्या अगदीच काठावर जाऊन पलटी झाला. विशेष म्हणजे मागील धुलीवंदनाच्या दिवशी याच ठिकाणच्या शेजारच्या विहीरीजवळ चारचाकी वाहनाचा अपघातात एकास जीव गमवावा लागला होता. राजुरी (न)- चिंचपूर मार्गावरील लगतच्या विहीरींचे स्ट्रक्चरल सेप्टी ऑडीट करून तत्काळ सुरक्षेच्या उपाय योजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. राजूरी

Comments


bottom of page