राज्य महिला आयोगाच्या अध्यपदी डॅशिंग मिरा बोरवणकर यांची निवड!
- Navnath Yewale
- 15 hours ago
- 2 min read

मुंबई: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा नाजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यानंतर या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर याची निवड निश्चित मानली जात आहे.
आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘ लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणार्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयेागाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे पोलिस दलातील प्रदिर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी होणार आहे.
महिलांचे हक्क, सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीने महिला आयोग अत्यंत महत्वाचे कार्य करू शकतो. महिला आयोगाचे अध्यक्षपद हे एक संवैधानिक, कायदेशीर पद आहे जे महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी थेट हस्तक्षेप करू शकते. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ‘ सुमोटो’ अर्थात स्वत:हून दखल घेण्याचा अधिकार महिला आयोगाच्या अध्यक्षांना आहे. मीरा बोरवणकर यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता महिला अयोगाच्या अध्यक्षपदी त्यांचा विचार करावा, अशी मागणी अनेक नेत्यांनी लावून धरली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मीरा बोरवणकर यांचे नाव सुचवले आहे.
मीरा बोरवणकर यां भारतीय पोलीस सेवेतील अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वोत्तम आयपीएस अधिकार्यांमध्ये घेतले जातेच, पण त्या देशभरात‘ सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना ‘ लेडी सिंघम’ असेही म्हणतात. मुंबईतील माफिया राजवट संपवण्यात मीरा बोरवणकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होती.
मीरा बोरवणकर या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. बोरवणकर 1981 बॅचच्या निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील ओ.पी. चढ्ढा हे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्का येथे होती. त्यामुळे मीरा यांनी 10 वी पर्यंतचं शिक्षण तिथूनच पूर्ण केलं. 1971 मध्ये वडिलांची बदली झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जालंधर येथून घेतले. त्यांचे पती अभय बोरवणकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहे. निवृत्त आयपीएस किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली विशेष जवळीक तसेच त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर या सदस्य असल्याने त्यांची सलगी अधोरेखित झाली. महिला अत्याचारासारखा गंभीर गुन्ह्याविषयी आरोप झाल्याने राज्यातल्या सर्व क्षेत्रातून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. अखेर चाकणकर यांनी राजीनामा देऊन त्यांच्याशी संबंधित चर्चांवर पडता टाकण्याचा प्रयत्न केला.



Printed a stack of word search puzzles for adults for our long flight. Kept the four of us quiet and happy for three hours.