top of page

राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा रद्द, अप्पर पोलिस महासंचालकांचा निर्णय ; 100 पैकी 80 प्रश्न एकाच पुस्तातून आल्याने कारवाई

पुणे: महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा अरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आता 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठांनी दिली आहे.


राज्य राखीव दल (सीआरपीएफ) गट क्रमांक 5शनिवारी (दि.2) मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खाजगी प्रकाशनाच्या ‘ पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ या पुस्तकातुन घेतल्याचा आरोप करण्यत आला होता. या पुस्तकात 100 पैकी तब्बल 80 प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत आल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.


त्यानुसार राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणर आहे.


नवीन वेळापत्रकानुसार एसआरपीएफ गट 5 दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 24 मे 2026 रोजी दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोळी,दौंड येथे आयोजित करण्यात येणार आहे. पुनर्रपरीक्षेमुळे उमेदवारांना न्याय मिळेल आणि भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


दरम्यान, एसआरपीएफ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतल्याचं नमूद केलं आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Comments


bottom of page