top of page

राज्यातील लाडक्या बहिणींना लाखाचं अनुदान - मंत्री बावनकुळे

ree

चंद्रपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रनधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद, नगरपंचायतीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातच आता सत्ताधार्‍यांकडून घोषणांचा पाऊस पाडत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज चंद्रपूर जिल्ह्यात प्रचार दौर्‍यावर होते. चंद्रपूरमधील घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.


राज्यातला तुकडेबंदी कायदा आम्ही आता हटवला आहे. त्या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे असे अश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना 1 लाख रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांची वीजबिल माफी आणि सूर्यघर योजनेतून मोफत वीज देण्याचा संकल्प बोलून दाखवला. तसेच काँग्रेसवर टीका करताना त्यांनी काँग्रेसला बुडतं जहाज असे संबोधले. पूजा ताई दुर्गम यांच्या विजयासाठी त्यांनी मतदारांना आवाहन केले.

Comments


bottom of page