राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यास अटक, राजकीय वर्तुळात खळबळ सोशल मीडियावरील विधान भोवले, मध्यरात्रीच पोलिसांकडून अटक
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांनी सोशल मिडियावर विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निेश कराळे यांना वर्धा पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास अटक केली.एका जमाजाबद्दल अपमानास्पद आणि आक्षेपर्हा शब्दांचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अजय शंकरराव डोंगरे यांनी पेालिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर प्रकरणाला सुरुवात झाली. त्यांच्या तक्रारीवरून नितेश बाळकृष्ण कराळे यांच्याविरुद्ध वर्धा पेालिसांनी गुन्हा दाखल केला होता.
31 जुलै 2026 रोजी ‘आरक्षण’ हटाव’ विषयावरील संबंधित व्हिडीओ नितेश कराळे मास्तर यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अरोप तक्रारीत करण्यात आला. संबंधित व्यक्तीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह ीारतीय न्या संहितेतील लागू कलमांनुसार कारवाईची मागणी तक्रारदारावकडून करण्यात आली होती. तक्रारदाराने तक्रारीसोबत व्हिडिओची लिंक आणि इतर पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत.
या सर्व पुराव्यानंतर नितेश कराळे मास्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी नितेश कराळे यांना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नितेश कराळे हे वर्धा येथील प्रसिद्ध प्राध्यापक, समाजिक कार्यकर्ते, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि राजकीय नेते आहेत. कराळे मास्तर या नावाने ते प्रसिद्ध आहेत. वर्ध्यातील फिनिक्स अकॅडमीचे ते संचाल आहेत.



Comments