राहुल गांधींनी टाकला आकडेवारीचा बॉम्ब; निवडणुक आयोगानं दिलं चॅलेंज!
- Navnath Yewale
- Aug 7
- 1 min read
देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतचोरीची थेट आकडेवारी मांडली

देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. पत्राकर परिषद घेत त्यांनी एक प्रकारे बॉम्बच टाकला आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर थेट विडणुक आयोगानंच त्यांना आव्हान दिलं आहे. कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत आजच संध्याकाळी याबाबत आयोगाने येऊन भेटण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. यासंदर्भात ट्विट करत आयोगानं त्यांना आव्हान दिलं आहे.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत आरेाप केला होता की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले आहेत. यांमध्ये लाखो अशी नावं टाकण्यात आली आहेत जी अयोग्य आहेत. तर लाखो योग्य मतदारांची नावं या याद्यांमधून वग——ळण्यात आली आहेत. राहुल गांधींनी याला मतांची चोरी असं संबोधलं आहे. तसंच म्हटलं की, निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान, नुकतंच कर्नाटकच्या निवडणुक अधिकार्यांनी देखील राहुल गांधींना पत्र लिहुन त्यांच्याकडं असलेली आक्षेपाची सर्व माहिती प्रतिज्ञापत्रावर देण्याची मागणी केली.
आयोगाचं ट्विट :
आपल्या फॅक्टचेकमध्ये निवडणुक आयोगानं म्हटलं की, मतदानाची चोरी हा आपल्या देशावर टाकेलेला अॅटम बॉम्ब असल्याचा राहुल गांधींनी केलेला उल्लेख हा दिशाभूल करणारा आहे. त्यामुळं जर राहुल गांधींना वाटत असेल की ते खरं बोलत आहेत तर त्यांनी मतदारनोंदणी कायदा 1960 च्या कलम 20(3)(ब) अंतर्गत प्रतिज्ञापत्रावर तसं लिहून द्यावं आणि ते कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांकडं आजच संध्याकाळी स्वत: सबमिट करावं. कारण त्यामुळं पुढील आवश्यक कारवाई आम्हाला करता येईल. पण जर राहुल गांधी जे काही बोलत आहेत यावर त्यांचाच विश्वास नसेल तर त्यांनी अशा पद्धतीचे चुकीचे निष्कर्ष काढणं थांबवावं तसंच देशातील जनतेची दिशाभूल करणं थांबवावं.



Comments