top of page

रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला गैरहजर; एसआयटीने बदलला चौकशीचा अँगल

भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतची ओळख रुपाली चाकणकर यांचा चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावर संपलेलं नसून रुपाली चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे.


रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहील्या नाहीत. अशोक खरातच्या मोबाईल डेटावरुन आज क्रॉस चौकशीवर भर देण्यात येणार आहे. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीवर भर असून मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात येत आहे. एसआयटीच्या तपासात महत्वाची माहिती येण्याची शक्यता आहे.


राज्य महिला अयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना खरात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे एसआयटीकडून समन्स बजावण्यात आले. मात्र, रुपाली चाकणकर चौकशीला हजर राहिल्या नाहीत. रुपाली चाकणकर यांनी महिला अयोगाच्या अध्यक्षा असताना अशोक खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणता फायदा पोहोचवला आहे का? याची चौकशी एसआयटीला करायची आहे. मात्र रुपाली चाकणकरांकडून एसआयटीच्या समन्सला कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही. रुपाली चाकणकर यांनी ‘ मी महिला असल्याने नाशिकला येऊ शकत नाही’ असे उत्तर दिल्याचे समजते.


दरम्यान, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महिला अयोगाने सुनावणी ठेवली होती. पिडितेने नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आली होत. 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी ही नोटीस देण्यात आली होती. मात्र या प्रकरणाचा तपास अधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाला महिला अयोगाकडे दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात फेब्रूवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला अयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीच पत्र देण्यात आलं होतं. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचचणीत आणीख वाढण्याची शक्यता आहे.


अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत माझ्याकडे माहिती नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही. आवश्यकता असल्याच आम्ही महिती घेतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्यवेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

स्वयंघोषित कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एक एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलिस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments


bottom of page