रुपूरमध्ये ट्रॅपकॅमेर्यात कैद होणार बिबट्याचा संचार ! , बिबट्याच्या जेरबंदासाठी आधिवास निश्चिती नंतर लावणार पिंजरा
- Navnath Yewale
- 19 hours ago
- 1 min read

बीड: बीडच्या रुपूर (ता. शिरुर कासार) शिवारात बुधवारी (दि.21) मनकरणा शिवराम नेटके वय 55 वर्षे (रा. कोळवाडी) या कापुस वेचताना बिबट्याने अचानक हल्ला चढवला.जखमी अवस्थेत त्यांच्यावर प्रथम शिरुर व त्यानंतर बीड येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून गुरुवारी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. अधिवास निश्चितीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतात कापुस वेचताना रुपूर शिवारात मनकरणा नेटके यांच्यावर बुधवारी बिबट्याने हल्ला चढवला. हल्ल्यात मनकरणा नेटके यांच्या चेहर्यावर, गळ्यावर, हातावर गंभीर जखमी झाल्या. मनकरणा यांचे प्रसंगावधान आणि नशिब बलवत्तर म्हणून त्या वाचल्या. दरम्यान, रुपूर, कोळवाडी, गोमळवाडा परिसरात डोंगर कपारीला लपण्यासाठी दडपण असल्याने परिसरात बिबट्याचा वावर निश्चित झाला आहे. बुधवारी कापुस वेचणी करणार्या मनकरणा नेटके यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या धास्तीने महिला, पुरुष शेतकरी मशागतीसाठी शेताकडे फिरकलेच नाहीत.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून उपाय योजना राबवण्यात येत आहेत. गुरूवारी (दि.22) वनपरिक्षेत्र अधिकारी ए.ए. घोडके, वनपाल श्री देवगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजिव अभ्यासक तथा मानद वन्यजिव रक्षक सिद्धार्थ सोनपवणे, वनरक्षक एन.के घोडके,वनमजुर अंबादास लवांडे, सोपान येवले सेवानिवृत्त वनमजुर शिवाजी आघाव यांनी घटनास्थळासह परिसरातील ठस्यांची पाहाणी करुन माग काढण्याचा प्रयत्न केला. सबंधीत ठस्यांचे हे बिबट्याचेच असल्याचा निर्वाळा यावेळी वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी दिला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याचा संचार व अधिवास निश्चित करण्याच्या उद्देशाने उपाय योजनांनुसार परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. ट्रॅप कॅमेर्याने बिबट्याची हलचाल टिपल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी वनकर्मचार्यांनी सांगितले. परिसरात बिबट्याचा वावर निश्चित झाला आहे त्यामुळे महिला, पुरुष शेतकर्यांनी सावधानता बाळगावी शक्यतो हातात काठी घेवून जाड कपडा मानेभोवती गुंडाळूनच शेतात जावे असे आवाहन करण्यात आले आहे.



Comments