रोहित पवार आक्रमक: मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात खडाजंगी? सुरु असलेली एफआयआर प्रक्रिया का थांबवली?,डीसीपींना फोन कोणाचा आला?; बारामतीत एफआयआर दाखल करणार
- Navnath Yewale
- Feb 25
- 2 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डिजीसीएने व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणास प्रतिबंध लावला आहे. त्याअणुषंगाने आज (दि.25) रोहित पवार व त्यांचे सहकारी कंपनीविरोधात एफआयर दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलिसांनी शेवटच्या क्षणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने आमदार रोहिती पवार व पोलिसांत चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी रोहित पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. डीसीपींना कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
.
मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झालेल्या आमदार रोहित पवार व त्यांच्या सहकार्यांचे सुरवातील म्हणणे ऐकून घेवून प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. पण ऐन वेळी डिसीपी पोलिस ठाण्यात आले प्रक्रिया थांबवल्याचा आरोप करत आमदार पवार, त्यांचे समर्थक व पोलिस यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत डीजीसीएवर गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, “ या अपघातात डीजीसीएचा हस्तक्षेप स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी 25 पैकी 5 विमाने बंद करून कारवाईचा दिखावा केला आहे. आमच्याकडे नवीन कायद्याचे पुस्तक आहे. ज्यातील नियमांचे उल्लंघन झाले आहे. पोलीस कर्मचारी जाधव, माळी, अटेंडर आणि पायलट या सर्वांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सर्वांना माहित असताना पोलिस टाळाटाळ का करत आहेत”? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातील घटनाक्रम सांगताना रोहित पवार म्हणाले की, आमचे वकील प्रांजळ यांनी पोलिसांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या, त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर लॅपटॉप आणला गेला आणि माझे स्टेटमेंट लिहिण्यास सुरुवातही झाली होती. जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असताना डीसीपी आले आणि त्यांनी एफआयआर घेण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार संतप्त : “ एफआयआर दाखल करणे हा आमचा घटनादत्त अधिकार आहे. पोलिस आम्हाला आमचा अधिकार का वापरू देत नाहीत? कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आली आहे? आम्ही आज इथे हक्कासाठी आलो होतो, अजितदादांना न्याय मिळत नाही. तिथे सामान्यांचे काय होत असेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आमचा माणुस होता म्हणून एफआयआर घेतले नाही का ? असा सावाल करत दिल्लीत काँग्रेसने शर्ट काढले तर एफआयआर घेतला, अपघात झाला तर एफआयआर होतो. मग आमचा उपमुख्यमंत्री गेला आहे अपघातात, त्याचा एफआयआर का नाही? असा हताश प्रश्नही त्यांनी केला. उद्या सकाळी 10:00 वाजता बारामती येथे जाऊन दादा यांनी बांधलेल्या इमरतीत जाऊन एफआयआर दाखल करणार असून तिथे तरी एफआयआर दाखल होतोय का हे पाहणार असल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.



Comments