रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा, अजित पवार पुरून उरला म्हणून त्यांच्या पोरांची काळजी वाटते- आमदार पडळकर
- Navnath Yewale
- Aug 17
- 1 min read

जत विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या घाणाघातील टीका करत रोहित पवार यांना थेट औरंगजेबाची वृत्तीचा असल्याचे म्हणत आमदार पडळकर यांनी आमदार रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
पवार आणि पडळकर यांच्यातील वाक्युद्ध महाराष्ट्राला ज्ञात आहे. परंतु अजित पवार महायुतीमध्ये सामिल झाल्याने आमदार पडळकर यांनी अजित पवारांवर बोलताना दिसत नाहीत, पण शरद पवार यांच्यापासून ते आमदार रोहित पवार यांच्यापर्यंत ते टीकेची झोड उठवतात.
माध्यमांशी संवाद साधनाता आमदार पडळकर म्हणाले की, मला काळीज अजित पवारांच्या पोरांची वाटते, कारण (रोहित पवार) हा औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वत:च्या बापाचा, भावांचा घात केला होता. अजित पवार त्याला पुरुन उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत. परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते. हा रोहित पवार औरंगजेबासारखी कृतीचा आहे.
भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय. त्यामुळं मला चिंता करण्याची अवश्यकता नाही, मी पवारांना कसाही असा..कसा ... तसा.., उलटा -पुलटा कसाही पुरुन उरलेलो आहे म्हणत आमदार पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. आता आमदार रोहित पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लगणार आहे.



Comments