रोहित पवारांचा सज्जड इशारा : दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, काकींना कट्रोल करता येईल हा चार नेत्यांचा भ्रम
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 2 min read
सांभाळून रहा, सांभाळून वागा, थोड्याच दिवसात नक्कीच कळेल ताकद काय असते

मुंबई: अजित पवारांच्या विमान अपघातबाबत त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सुरूवातीपासूनच घातपाताचा संशय व्यक्त करत मुद्दा लावून धरला आहे. मुंबई, दिल्लीत पत्रकार परिषदांद्वारे सादरीकरणातून त्यांनी अनेक संशयास्पद मुद्यांकडे बोट दाखवत त्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्यानंतर रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि.27) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांनी शिवतीर्थ च्या आवारात माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील चार प्रमुख नेत्यांना सज्जर इशारा दिला. काल गुरुवारी (दि.26) राष्ट्रवादी पक्षाच्या अधिवेशनामध्ये पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जय पवार यांना स्टेजवर बाजूला बसण्यासाठी हातवारे करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तथा नुकत्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत ‘ मनस्थितीचं कारण द्या’ असं म्हणत बोलण्यापासून रोखणं असो किंवा सुनेत्रा पवार यांच्या जवळ येण्यापासून रोखू नका असं सरोज आहिरे यांच वक्तव्य असो यासह इतर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. शिवाय पत्रकार परिषद संपल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता रोहित पवार यांच्यावर निशाना साधत ‘ सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्ष निवडीच्यावेळीच बारामती पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची स्टंटबाजी केली जात आहे ’ असं वक्तव्य करत प्रत्यक्ष रोहित पवार यांच्यावर निशाना साधला.
या सर्व घडामोडींचा आज रोहित पवार यांनी खरपूस समाचार तर घेतलाच पण प्रमुख चार नेत्यांना सज्जड इशाराही दिला. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा काकींना अजित पवार पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड केली ही चांगली गोष्ट आहे. पण काल आम्ही पाहिलं की, तिथं आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी आहेत, पक्षाच्या राष्ट्राध्यक्षा आहेत. जय ला जागा द्यायची तर ते नेते तिथ ठरवणार, कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं. कोणी काय करतं हे पाहून... आम्हाला म्हणातय राजकारण करताय. तुम्ही रजकारणाचा मुद्दा काढला आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो त्यामुळे काकी मोठ्या नेत्या आहेत, काकींचा आदर आहे.
काकी नक्कीच अजितदादांसारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून , सांभाळून वागा आणि सांभाभून त्या ठिकाणी बोला. सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत. पवार परिवारच्या एक घटक आहेत. आणि मग त्या प्रेसकॉन्फरंन्सला सुद्धा सामोरं जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्याठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येऊ शकत नव्हतं पण काकींना करता येईल तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कोणच्या पद्धतीने पार्टी तिथे चालवत असतो त्यामुळे हे चार कुठले नेते आहेत त्यांनी थोडसं सांभाळून रहा, सांभाळून वागा असा सज्जड इशाराच रोहित पवार यांनी यावेळी दिला.



Comments