लक्ष्मण हाकेंचा जेजूरीतून एल्गार; जरांगे पाटील, सरकारवर निशाना
- Navnath Yewale
- Oct 5
- 1 min read
चौथी नापासच्या सांगण्यावरून ओबीसी आरक्षण संपलंय? बहुजनांची जत्रा जेव्हा आझार मैदान किंवा शिवाजी पार्कवर येत नाही तोपर्यंत...

जेजूरी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ओबीसी नेत्यांच्या बैठकीस डावलल्याने लक्ष्मण हाके यांनी नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्यासह सरकारवर निशाना साधला.
जेजूरी येथे दसरा मेळाव्यास बोलताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण मुद्यावरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एका चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून आज ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावाही हाके यांनी केला.
मनोज जरांगे यांना उद्देशून हाके म्हणाले की, बहुजनांची जत्रा जोपर्यंत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर एकत्र येणार नाही, तोपर्यंत त्यांना कोणीही मोजणार नाही. ज्या दिवशी ओबीसी समाज एकत्र येऊन आपली ताकद दाखवेल, त्या दिवशी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. हाके म्हणाले की, जर ओबीसी समाजाला मोजले गेले, तर मनोज जरांगे यांचा गावचा एक सरपंचसुद्धा निवडणून येणार नाही. दरम्यान हाके यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधान आले आहे.


Comments