लाडकी बहिण योजने बाबत मोठी अपडेट; अर्जांची पुन्हा छाणणी!
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे. राज्य सरकारने कुटूंबाचे उत्पन्न कमी असणार्या महिलांना वैयक्तिक 1500 रुपये लाभ देण्यासाठी विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहिण योजना सुरू केली होती.पण विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर योजनेसाठी निकष लावण्यात आले. आता निकषामध्ये न बसणार्या महिलांनीसुद्धा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनस्तरावरुन मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहिण योनेच्या अर्जाची पुन्हा छाणणी करून निकषात न बसणार्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनस्तरावरून योजनेबाबत आता कठोर भूमिका घेण्यात आली आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाणणी करण्यात येत आहे. ज्या महिला या योजनेच्या निषांत बसत नाहीत त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. अनेक महिलांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असूनदेखील काही महिलांनी या योजनचा लाभ घेतल्याचे अढळून आले, जे निकषांविरोधात आहे.
लडकी बहिण योजेनेच्या आर्जांची छाणणी संदर्भात मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सरकारी कर्मचारी महिला देखील या योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीतही पडताळणीची प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवहपास दोन अर्जांची छाणणी केल्यानंतर सुमारे 2289 सरकारी कर्मचार्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब समोर आली आहे.
Comentarios