लाडकी बहीण योजने बाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! योग्य वेळी 2100 रुपये देणारच; सातार्यातून झेडपीच्या प्रचाराची सुरुवात
- Navnath Yewale
- Jan 26
- 2 min read

सातारा: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुराळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून आज प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वषाृत अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडुण आणायचं. असे म्हणत पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसंदर्भाने प्रचारात आघाडी घेतली. नुकतेच ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह एकनाथ शिंदेंनी सातार्यातून तुफान फटकेबाजी केली.
लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिंमत झाली नाही. मात्र जे खोडा घालयाचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला. महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडुन आल्या नव्हत्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान महायुतीला केल्याचं म्हटलं . तसेच माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते. म्हणून मी याचा विचार करून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली.
माझी कर्मभूमी मुंबई असली तरी माझी जन्मभूमी सातारा आहे. सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिलं. आधिच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हतं. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम करावं लागतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंवर टीका: मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या, कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जवळ आणण्याचे काम सुरू झालंय, साडेतीन वर्षे झालं आम्ही उठाव केला, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसर्या क्रमांकाचा पक्ष झाला शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते. गेला तो चोर आणि कचरा असं किती दिवस बोलणार? आमच्या सोबत ते का आले? याचा विचार करा, असा सल्लाही ठाकरेंना त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेचा अजेंडाच विास आहे, शिवसेना ठाण्यापर्यऐत मर्यादित आहे म्हणत होते. मात्र, शिवसेना चांदा ते बांदा पसरलीय, दगडू दादांचं अभिनंदन करतो त्यांनी एवढी वर्षे दिली. दगडू दादांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामाचं चीज करायला पाहिजे होतं. पण त्यांनी केलं नाही. दगडू दादांनी आणि मी सुद्धा स्वाभिमान दाखवला. या मातीत स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे माजी आमदार दगडू सपकाळ यांचं कौतुक केल.
लाडक्या बहीणींना 2100 देणारच : पर्यटन सुरक्षा दल स्थापन करणारा सातारा पहिला जिल्हा आहे, येथील 22 गावांचं पालकत्व मी स्वीकारतोय, असे म्हणत थेट सभेतूनच एकनाथ शिंदेंनी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. ( 10 हजार लोकांसाठी एक इंडिस्ट्री आणायचं फायनल झालंय, आचार संहिता संपल्यावरयाला गती मिळेल असं सामंत यांनी उपमुख्यमंत्री यांना सांगितलं.) कुणबी प्रमाणपत्र देणारा एकनाथ शिंदे आहे, लवकरात लवकर महादेव कोळी जातीच्या जात पडताळणीचे दाखले देण्याचे काम सुरु होईल, असेही शिंदेंनी म्हटले. पर्यटनाला चालना देण्यासाठी आपल्याला काय कराता येईल ते करूयात, पंधराशे रुपये लाडक्या बहीणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार हा शब्द लाडक्या बहीणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत एक बार मैने कमिटमेंन्ट करदी तो मै खुदकी भी नही सुनता, अशा डायालॉगही शिंदेंनी यावेळी मारला.



Comments