top of page

लाभाच्या प्रतिक्षेतील लाडक्या बहिणी भडकल्या! ‘निवडणुकीतल्या लाडक्या बहीणी, आता सावत्र झाल्या काय’? संतप्त महिलांचा सवाल

वाशिम/हिंगोली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनेचा सुरूवातील लाभ मिळाला मात्र, ई- केवायसी करूनही लाभ मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणी संतापल्याचे चित्र आज दिसून आले. ई- केवायसी करुन देखीलही दोन महिन्यापासून लाभ मिळत नसल्याने वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या दिला. त्याचबरोबर हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातही मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या महिलांनीही संताप क्यक्त केला.


वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर, लाभापासून वंचित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दोन महिन्यांचा लाभ न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त केले. ई-केवायसी करून देखील प्रशासनाकडून ती न झाल्याचे सांगितले जात आहे. लाभ द्यायचा असेल, तर सरसकट द्या, नाहीतर सर्वांचा लाभ बंद करा, असा संताप महिलांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायस्वरुपी बंद होणार, या चर्चेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली. दोन महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला, याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र ई-केवायसीमध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30 हजार महिलांचा लाभ थांबलेला आहे. त्यामुळे ई-केवायसीमधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी. अशी मागणी आता लाभार्थी महिलांनी केली आहे.


योजनेचा लाभ न मिळाल्याने यवतमाळ मधील लाभार्थी महिलांनी महिला व बालकल्याण विभागात धडक दिली. महिला लाभार्थी यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवरप संताप व्यक्त केला. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या, अन्यथा सर्वांचा लाभ बंद करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, असे पत्र थेट सरकारकडे पाठवले आहे.


शेजारणीला पैसे येतात: योजनेच्या लाभापासून वंचित रुपाली महाजन यांनी, दहा महिन्यांपर्यंत मला पैसे आले. त्यानंतर मला लाभ मिळायचा असेल , तर योजनेसाठी ई- केवायसी करायला सांगितले. ई-केवायसी एकदा सोडून, दोनदा करायला लावली. त्यानंतर देखील योजनेच्या लाभाचा हप्ता आला नाही. दोन महिने झाले, तरी लाभ मिळाला नाही. माझ्या शेजारी असणार्‍या लाभार्थ्यांना लाभ मिळाला. परंतु मला लाभ आलेला नाही असे त्या म्हणाल्या.


नाहीतर योजना बंद करा: काही लाभार्थ्यांना लाभ मिळतो आणि आम्हाला का नाही, याचा विचार करण्यासाठी आम्ही सर्व महिला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो आहे. इथं आम्ही आमचे आधारकार्ड दिले आहेत, त्यावेळेस पुन्हा आम्हाला ई-केवायसी चुकल्याचं सांगण्यात आलं आहे. माझ्यासारखी काहीशी सुशिक्षित महिला ई-केवायसी करतील. परंतु अशिक्षित लाभार्थी महिलांचं काय? लाडकी बहिण योजना सरसकट चालू ठेवा, नाहीतर बंद करा. अशा कडक शब्दात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला रुपाली महाजन यांनी सुनावलं.


किती वेळा ई-केवायसी करायची?:

योजनेचा लाभ न मिहाल्या रुपाली केंडे म्हणतात, मी दहाव्या महिन्यामध्ये याजनेसाठी ई-केवायसी केली. परंतु माझ्या दोन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर सांगतात की, तुमची ई-केवायसी चुकलेली आहे. परंतु मला ई-केवायसी सक्सेस झाल्याचा मेसेज आलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला योग्य प्रकारचे उत्तर मिळत नसल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.

Comments


bottom of page