top of page

लोकशाही धोक्यात?,... तर पुढचे 50 वर्षे भाजपची सत्ता- अंजली दमानिया , शिंदेंचा वापर होतोय; बिलं आणण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र

मुंबई: शिवसेना (ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाचे निशाण हाती घेत थेट वेगळा गट स्थापन करून शिंदेच्या शिवसेनेत सहभागी होण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यातील या राजकीय घडामोडीवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.


शिवसेना (ठाकरे) पक्षातील बंडावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषेत संताप व्यक्त केला. पत्रकारांशी संवाद साधताना अंजलि दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर गंभीर आरोप करत प्रादेशिक पक्षांना आवाहन केले. अंजलि दमानिया म्हणाल्या की, ‘सोकॉल्ड बिलं आणण्यासाठी भाजपला लोकसभा आणि राज्यसभेत जास्तीचे खासदार हवे आहेत. त्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. यासाठी शिंदेचा वापर होत आहे, तो त्यांच्या लक्षात येत नाही . भाजपचं सोकॉल्ड बिल आलं तर, या देशात पुढची 50 वर्षे भाजपचीच सत्ता राहील असा दावाही त्यांनी केला.


पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या की, शिंदेसेनेच्या विरोधात मतदान करत मतदारांनी निवडून दिलेले खासदारच दिल्लीतील हॉटेलात बसून मतदारांचा विश्वास विकत असतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. बावनकुळे म्हणाले की याच्याशी भाजपचा काही एक संबंध नाही, नक्कीच संबंध आहे. लोकसभा अध्यक्षांना भेटल्यानंतर ते अमित शाहांची भेट घेणार होते असा खळबळजनक दावाही दमानिया यांनी केला. याशिवाय त्यांच्यातील एकाला मंत्री पद आणि 100 कोटींच्या निधीची ऑफर दिल्याचा धक्कादायक दावाही दमानिया यांनी केला. ठाकरे आणि पवारांनी आता मोठ्या यंत्रणे मार्फत या सहा मतदारसंघात मतदारांचा कौल घेवून त्यांच्या विरोधात याचिका दाखल करायला हवी, किमान आता तरी प्रादेशीक पक्षांनी जागं व्हायला हवं, लोकशाही वाचावण्यासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचं म्हणत दमानिया यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षातील बंडावर एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला.

Comments


bottom of page