कर्नाटक काँग्रेसच्या चाणक्याने भाजपचे आमदार फोडले,7 पैकी पाच जाग्यावंर विय; दिल्लीत राजकीय भूकंप
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने पाच तर भाजपने दाने जागांवर विय मिळवला असला, तरी निकालानंतर क्रॉस व्होटिंगच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले आहे.
मात्र अंतिम निकालानंतर अपेक्षेपेक्षा वेगळे मतदान झाल्याचे चित्र समोर आल्याने क्रॉस व्होटिंगच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विनय कार्तिक,टिप्पण्णप्पा कमकानूर, बी.एस.शिवण्णा,बी.के. हरिप्रसाद आणि पी. व्ही. मोहन हे विजयी झाले. भाजपचे उमेदवार रघू कौटिल्य आणि लिंगराज पाटील यांनीही विजय मिळवला. मात्र जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडी (एस) चे उमेदवार गाविंद राजू यांचा पराभव झाला. त्यांना केवळ 14 मते मिळाली. निवडणुकीतील मतदानाच्या पद्धतीने दोन्ही प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंतिम मतमोजणीत काही मतांचे अनपेक्षित हस्तांतरण झाल्याचे दिसून आल्याने पक्षांतरित मतदान म्हणजेच क्रॉस व्होटिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अंतिम मतमोजणीनुसार काँग्रेसचे विनय कार्तिक हे सर्वाधिक 32 मते मिळवणारे उमेदवार ठरले. त्यांच्यानंतर काँग्रेसचे टिप्पण्णप्पा कमकानूर, बी.एस.शिवण्णा आणि बी.के. हरिप्रसाद यांना प्रत्येकी 30 मते मिळाली काँग्रेसचेच पी.व्ही. मोहन यांनी 29 मतांसह विजय मिळवला. भाजपचे रघू कौटिल्य यांनाही 29 मते मिळाली, तर लिंगराज पाटील यांना 27 मते मिळवत विजय मिळवला.
भाजपचे नवनिर्वाचित आमदार परिषद सदस्य रघू कॉटिल्य यांना 30 मते मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यांना अंतिमत: 29 मते मिळाली निकालानंतर बोलताना त्यांनी क्रॉस व्होटिंगचा मुद्दा पक्षाच्या उच्च नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे सांगितले. मला ही संधी दिल्याबद्दल आनंद आहे. क्रॉस व्होटिंगचा मुद्दा पक्षाच्या हायकमांडसमोर ठेवण्यात आला आहे. असे रघू कौटिल्य म्हणाले.
दरम्यान, या निकालानंतर कर्नाटकच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीदरम्यान काही आमदारांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरुद्ध मतदान केले का, याची छाननी करण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रमुख पक्ष आता मतदानाच्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करून कोणत्या आमदारांनी पक्षविरोधी मतदान केले का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
अंतिम मतांची आकडेवारी : विनय कार्तिक (काँग्रेस)-32 मते, टिप्पण्णप्पा कमकापूर (काँग्रेस)-30 मते, बी.एस. शिवण्णा (काँग्रेस)-30 मते, बी.के. हरिप्रसाद (काँग्रेस)-30 मते, पी.व्ही. मोहन (काँग्रेस)-29 मते, रघू कौटिल्य (भाजप)-29 मते, लिंगराज पाटील (भाजप)-27 मते, गोविंद राज (जेडी-एस)- 14 मते.
कर्नाटक विधान परिषद निवडणुकीतील हा निकाल आणि त्यानंतर समोर आलेले क्रॉस व्होटिंगचे आरोप येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात चर्चेचा प्रमुख विषय ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पि या निकालाचे सखोल विश्लेषण करण्याच्या तयारीत आहेत.



Comments