top of page

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा कहर वणई गावात घर कोसळले

 राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्काळ मदत

ree

डहाणू : तालुक्यातील वणई (भट्टीपाडा) गावात सततच्या वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. गावातील रहिवासी शिणवार भिवा पारधी यांचे बांधकामाचे घर कोसळले. या घरात शिणवार पारधी व त्यांची पत्नी असे दोघेच राहत असल्याने जीवितहानी टळली असली, तरी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घराच्या आसपास संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून, घराकडे जाण्यासाठीही नागरिकांना चिखलातूनच जावे लागते.

 

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डहाणू तालुका अध्यक्ष (आदिवासी सेल) विलास सुमडा (रा.गोवणे) यांनी तत्काळ पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुशांत चव्हाण, पक्षाचे युवा नेतृत्व करण ठाकुर यांचे बंधू सिद्धार्थ ठाकुर यांना ही बाब कळवली. त्यानंतर विलास सुमडा स्वतः घटनास्थळी पोहोचले, घराची प्रत्यक्ष पाहणी केली व कुटुंबियांचे सांत्वन करून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार आनंद भाई ठाकूर यांच्या आदेशाने व करण ठाकुर यांच्या पुढाकाराने या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत थेट परिवाराच्या हाती सुपूर्त करण्यात आली.


ree

 

या वेळी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन भोईर, कृष्णा सातपुते, राजेश ठाकूर, तसेच वणई गावचे बूथ प्रमुख मुकेश गहला व ग्रामस्थ गोटु दुबळा, विकास करमोडा व अशोक भुयाल उपस्थित होते. नागरिकांनी या मदत उपक्रमाचे स्वागत केले असून, प्रशासनानेही अशा आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Comments


bottom of page