वाहनधारकांना पुन्हा इंधन दरवाढीचा झटका; सीएनजीची मध्यरात्रीपासून दरवाढ लागू
- Navnath Yewale
- 5 hours ago
- 2 min read

पुणे : आखाती देशातील युद्धामुळे मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधनदरवाढीचा आणखी भडका उडाला असून वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे.
अमरिका आणि इराधमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे आखाती देशांमधून भारतात येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे देशात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. काही ठिकाणी डिझेलची टंचाई जाणवत आहे. दरम्यान, स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे कच्च तेल महाग झालं आहे, ज्याचा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या कितीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे .
पुण्यातून सीएनजीच्या दरवाढीची माहिती समोर आली आहे. एमएनजीएलकडून सीएनजीच्या किरकोळ विक्रीदरात प्रति किलो 2 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सीएनजीचे दर 92 रुपये 25 पैशांरून 94 रुपये 75 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत. वाढलेले दर हे 27 मे च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढ करण्यात आल्याचं एमएनजीएलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आता सीनजी दरवाढीचा फटका वाहनचालकांना बसणार आहे, त्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या प्रवासखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीमुळे सर्व सामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ सुरूच आहे.
याशिवाय पुढील काही दिवसांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करा, पेट्रोल-डिझेलची बचत करा असं आवाहन केलं होतं. त्यानंतर काही दिवसांमध्येच पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढवण्यात आले. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे.



Comments