विजय थालापतीला भाजपची मोठी ऑफर, 80 जागा आणि उपमुख्यमंत्रीपद
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 2 min read

चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एक नवीन चर्चा वगेाने पसरत आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकका जवळ येत असताना, राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी, सर्वात चर्चेचा विषय अभिनेता राजकारणी थालापती विजय आणि त्यांचा पक्ष तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) आहे. माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयला त्यांच्या युतीमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना एक मोठी ऑफर दिली आहे.
भाजपने विजय यांच्या पक्षाला सुमारे 80 जागा देऊ केल्याची माहिती आहे. शिवा अशीही चर्चा आहे की, जर ही युती झाली तर विजय यांना उपमुख्यमंत्रीपदही देऊ शकत. या संभाव्य कराराची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी या वृत्तांमुळे तामिळनाडूच्या राजकारणात निश्चित खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार राज्यात आपले स्थान मजबूत करण्यासाठी भाजप नवीन राजकीय समीकरणे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून, अभिनेता विजय आणि त्यांच्या पक्षाला (टीव्हीके) यांना एनडीएमध्ये सामील करण्यासाठी पक्ष सक्रिय झाला आहे. वाटाघाटी दरम्यान, भाजपने विजय यांच्या पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी सुमारे 80 जागा देऊ केल्याची माहिती आहे. निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यास विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाचीही ऑफर देण्यात आली आहे. दरम्यान, काही अहवाल असेही सूचित करतात की, विजय स्वत: मुख्यमंत्रीपदाबद्दल अधिक महत्वकांक्षी आहेत, म्हणून वाटाघाटी अद्याप अंतिम झालेल्या नाहीत.
दरम्यान, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजप ही संभाव्य युती पुढे नेण्यासाठी विविध मार्गांचा वापर करत आहे. वाटाघाटी सुलभ करण्यासाठी दुसर्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचा मध्यस्थ म्हणून समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांमधील संवाद राखण्यात आणि तडजोडीच्या शक्यतांचा शोध घेण्यात हा मध्यस्थ महत्वाची भूमिका बजावत आहे. ही प्रक्रिया अद्याप प्राथमिक असल्याचे सांगितले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते भाजप विजयच्या मोठ्या चाहत्यांकडे लक्ष ठेवून आहे. विजय हा तामिळनाडूमध्ये केवळ एक अभिनेता नाही तर एक अतिशय लोकप्रिय सार्वजनिक व्यक्ती आहे. त्याच्या चित्रपटांचा प्रभाव आणि त्याचा पाठिंबा महत्वाचा मानला जातो. म्हणूनच भाजपच्या रणनीतीकारांचा असा विश्वास आहे की, विजयच्या मतपेढीचा एक छोटासा भाग युतीकडे हस्तांतरित झाल्यासही निवडणुक निकालावर महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. तामिळनाडूमध्ये अशा अनेक निवडणुका झाल्या आहेत जिथे विजय आणि परभवाचे अंतर खूपच कमी फरकाने निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत, 2 % मतांचा बदल देखील अनेक जागांचे निकाल बदलू शकतो.
दरम्यान, यावर्षी तामिळनाडूमध्ये विधानसीा निवडणुका अपेक्षित आहेत आणि निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकेल, असा विश्वास आहे. विजय आणि त्यांच्या पक्षाभोवती सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण आणखी मनोरंजक बनले आहे. जर टीव्हीके खरोखरच भविष्यात एनडीए चा भाग झाला तर त्याचा थेट परिणाम निवडणूक गतिमानतेवर होऊ शकतो. विशेषत: ज्या जागांवर विजयाचे अंतर खूपच कमी आहे. सध्या दोन्ही पक्षांमधील चर्चा सुरुवातीलच्या टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु हे स्पष्ट हे की, अभिनेता-राजकारणी विजय आता तामिळनाडूच्या राजकारणात एक महत्वाचा खेळाडू बनला आहे आणि आगामी निवडुकीत तो महत्वाची भूमिका बजावू शकतो.



Comments