top of page

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा संतोष चव्हाण पुरता अडकला, विद्यानंदच्या भाषा कौशल्याचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, विद्यानंद बापट आणि संतोष पंडित यांच्या समर्थनार्थ पुणेकर रस्त्यावर

पुणे: पुण्यात गणेशोत्सवात डीजे आणि ढोल ताशा पथकांच्या विरोधात ‘ एकटा बास’ म्हणत विरोधात उतरलेल्या विद्यानंद बापट या तरुणाने अवघ्या डीजे माफियांना सुता सारखं सरळ केलं आहे. विद्यानंद बापट यांनी ज्या प्रकारे विरोध ते पाहून डीजे माफियांना आवरतं घ्यावं लागलं आहे. पण, मुद्याच्या लढाईत गुद्यावर आलेल्या संतोष चव्हाण याला आता पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.


विद्यानंद बापट या तरुणाने गणेशोत्सवामध्ये रस्त्यावर डीजे लावणे, ढोल ताशा पथक आणि मंडळाकडून रस्त्यावर अडवणूक करण्याच्या मुद्यावर जोरदार विरोध केला. पण, गुरुवारी विद्यानंद बापट एका माध्यमावर प्रतिक्रिया देत असताना संतोष चव्हाण यांनी विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला आणि कानशिलात लागावली. त्या दरम्यान, पोलिसांनी या संताष चव्हाणला अटक केली होती.


त्यानंतर आता संतोष चव्हाणला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने संतोष याला 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीचे गुन्हे चव्हाणविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत. आज संतोष चव्हाण यास न्यालयात हजर केल्यानंतर एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.


दरम्यान, विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरुड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहे. तो एका स्थानिक बांधकाम व्यवसायिकाकडे नोरकीला असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, राऊतवाडी येथील ‘ प्रियदर्शनी गणेश मंडळ’चा तो माजी अध्यक्ष राहिला आहे. एवढंच नाहीतर संतोषच्या विकृत आणि हिंसक वृत्तीचा भयानक चेहरा तीन वर्षापूर्वीच समोर आला होता. ज्या हातांनी सांभाळ करायचा, त्याच हातांनी संतोषनं आपल्या जन्मदात्या वडिलांना अत्यंत क्रूरपणे बेदम मारहाण केली होती. या अमानुष कृत्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या वडिलांनी संतोषशी असलेले सर्व संबंध कायमचे तोडून टाकले होते.


आरोपी संतोष चव्हाणवर यापूर्वीच पुण्यात कट रचणे, प्राणघातक हल्ले करणे आणि मारामारी यांसारखे 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केल्यानंतर संतोषने तातडीने आपला मोबाईल फोन बंद केला आणि तो शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाने तांत्रिक श्लिेषणाच्या आधारे अवघ्या तीन तासांत त्याचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या . आता या हल्ल्यामागे मुख्य कारण काय आणि यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे.


विद्यानंद बापट यांच्या भाषेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक : डीजेमुळे होणार्‍या ध्वनीप्रदुषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. डीजेला ठाम विरोध अन् प्रमाण मराठीचा वापर यामुळे सोशल मीडीयावर त्यांच्यावर मीम्सचाही महापूर आला आहे. तसंच काही अतिउत्साही तरुणांनी तर थेट एआचा वापर करत बापट यांना डीजेवर नाचताना दाखवलं आहे.दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांच्या भाषा कौशल्याचं कौतुक केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बापट म्हणाले की, माझ्यासाठी तर कोणत्याही गोष्टीपेक्षा साध्य महत्वाचं असून मी जो मुद्दा मांडत आहे तो तउीस जायला हवा.


विद्यानंद बापट आणि संतोष पंडित यांच्या समर्थनार्थ पुणेकर रस्त्यावर: सोशल मीडियावर विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडत समस्यांकडे लक्ष वेधणारे संतोष पंडीत यांना सोशल मीडियावरील त्यांच्या स्वत:च्या अकाऊंडवर अपलोड व्हिडिओतून व्हिडिओतील वक्तव्यामुळे भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. तर डिजेच्या विरोधात आवाज उठवणार्‍या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ल्याचं प्रकरण चांगलच गाजत आहे. पुण्यातील या दोन्ही प्रकरणांनी सोशल मीडियावर वेगळेपनाची क्रेज निर्माण केली आहे. त्यातच आता पुण्यातील गुडलक चौकात कलाकार कट्यावर पुणेकरांनी एकत्र येत विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा आणि संतोष पंडित यांच्या अटकेचा निषेध केला.

Comments


bottom of page