top of page

विधासभा निवडणुकांपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे दोन लोक भेटले होते- शरद पवार

ree


नागपूर: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बंगळुरु येथील माधवपूर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांमार्फत मतचोरीचे पुराव्यासह आरेाप केले असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत मोठा दावा केल्याने देशाच्या राजकिय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे दोन लोक आपल्याला दिल्लीमध्ये भेटायला आल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. नागपूरमधील पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी हा दावा केला आहे. पवारांच्या दाव्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.


नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, मला आठवतयं विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नांव आणि पत्ते माझ्याकडे नाहीत. दोघांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं, निवडणुक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचीतही शंका नव्हती.


असे लोक भेटत असतात पण दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर त्या लोकांनी आणि राहुल गांधी यांच्याशी भेट करून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झालं. हा आपला रस्ता नाही, लोकांचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला आहे.


मला माहिती अशी आहे की, दोन व्यक्ती शरद पवारांकडे गेले होते, त्यांनी मतदार याद्या मॅन्युपुलेट करून देऊन अमूक-अमूक सीट निवडून देऊ, 160 आकडा त्यांनी सांगितला होता. मला जे पवार साहेब माहिती आहेत त्यांचा यावर विश्वास बसला नाही. ते बोलले असं कसं होऊ शकतं. त्यांनी हा विषय पूढे काही नेला नाही. दोन व्यक्ती आल्या होत्या हे उभ्या जगासमोर आणि भारताला सांगितलं आहे. मतदार यांद्यामध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पवारांपर्यंत पोहोचली होती हे साहेबांनी सांगितल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Comments


bottom of page