top of page

विधीमंडळ सभागृहात तुकडे बंदी सुधारणा विधेयक मंजूर

शेत-शिवारातील निवासीजागांसाठी महत्वाचे; 60 लाख लोकांना फायदा

ree

नागपूर: बहूचर्चित आणि महत्वाचं तकडे बंदी सुधारणा विधेयक विधीमंडळात आज एकमतानं मंजूर झालं. त्यामुळे छोट्या तुकड्यांमध्ये घरं बांधलेल्या नागरिकांना दिलासा मिळाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे.


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेल्या उत्तरानुसार या विधेयकामुळं ज्यांनी जमिनिचे छोटे- छोटे तुकडे घेऊन घरं बांधली त्यांना या कायद्याचा फायदा होईल. हा महसूलचा तुकडा बंदी कायदा असल्यानं त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. नागरिकांना जमिनीचे हिस्सेवाटप आणि खरेदी करण्यात कायदेशीर अडचणी येऊ म्हणून हे विधेयक आणलं आहे. रजिस्ट्री, खरेदी असे अनेक मुद्दे या कायद्यामुळं अडले होते. आम्ही नगरविकासाच्या कुठल्याही कायद्याला हात लावत नाही. या प्रक्रिये एकही पैसा न घेता मानवीकरण करणं सुरू आहे. या कायद्याने डीपीचे कोणतेही प्लॅन बदणार नाहीत.


राज्यात आरपी आणि डीपी दोन्ही सुरू आहेत. परंतु हा कायदा सरसकट ग्रामीण भागासाठी आणता येणार नाही. कारण हा कायदा सरसकट आणला तर शेतीच राहणार नाही. ग्रामीण भागातील केवळ रहिवासी क्षेत्रासाठी हा कायदा लागू असेल. सरकारी जमिनीवर कुणी तुकडे पडले असतील तर त्यांना देखील याचा फायदा होणार नाही. यासाठी एक एसओपी तयार करण्यात आली आहे. या विधेयकाचा 60 लाख लोकांना फायदा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Comments


bottom of page