top of page

वैद्यकिन्ही टोलनाका चालकाची मुजोरी, नियोजित हॉटेल व्यवसायिक कुटुंबीयांना मारहाण

Dec 30, 2025
1 min read

बीड: बीडच्या वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) येथील टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी नियोजित हॉटेल व्यवसायिक व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.29) रात्री घडली. या मारहाणीत सह जण जखमी झाले असून बीडच्या शासकिय रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले.


आहिल्यानगर- लातूर मार्गावरील बीडच्या वैद्यकिन्ही (ता. पाटोदा) टोलनाका एचपीसीएल कंपनीच्या कंत्राटदाराने खासगी व्यक्तीस चालविण्यासाठी दिला आहे. टोलनाका चालक व त्याच्या कर्मचार्‍यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.29) सायंकाळी 9:00 च्या सुमारास एक चारचाकी टोल नाक्यावर आली. गाडी चालकाचे टोलचे बॅलेन्स संपल्याने प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. बॅलेन्स करण्यासाठी वेळ लागत होता त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांनी गाडीचालकास गाडी बाजूला लावण्यास सांगितले. यावरून गाडी चालकाशी टोलनाका चालकासह कर्मचार्‍यांची शाब्दिक चकमक झाली. हा वाद सोडवण्यासाठी महादेव राजाराम राख, सुरज प्रभाकर बांगर, जयश्री प्रभाकर बांगर, सौरव प्रभाकर बांगर, प्रभाकर पांडुरंग बांगर, योगेश रामराव राख यांनी मध्यस्थी केली.


या रागातून टोलनाका चालकासह कर्मचार्‍यांनी मध्यस्थि करणार्‍यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, या गोंधळात चारचाकी टोलनाक्यावरून निघून गेली होती. कर्मचार्‍यांनी राख आणि बांगर यां नियोजित हॉटेल व्यवसायिकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी जखमींचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता “आम्हाला प्रत्यक्ष पोलिस अधीक्षक यांना भेटायचे आहे ’ असे म्हणत जखमींनी जबाब देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. या प्रकरणालाही आता जातीय आणि राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.


पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या परिसरात जखमींसह नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत आरोपींना अटक करण्याची माध्यमांसमोर मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाची योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाईचे अश्वासन दिले असून लवकरच दोषींना अटक करण्याची ग्वाही दिली आहे.

Comments


bottom of page