top of page

वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या!


गेल्या 21 मे पासून फरार असलेल्या निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नेपाळ सीमेवरून निलेश चव्हाण यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्या नंतर पुण्यासह राज्यभरात एक खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू पश्चात तिच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड, बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटूंबीयांना रिव्हॉल्वरचा धाक दाखल्या प्रकरणी पुणे पोलिसात निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांची तीन पथकं फरार चव्हाण याच्या मागावर होती अखेर आज पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.


वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे सोपवले होते. मृत्यू पश्चात तीन दिवस बाळाचा थांग पत्ताही लागत नव्हता. मात्र, बाह निलेश चव्हाण याच्याकडे असल्याच्या खात्रीलायक माहितीनुसार कस्पटे कुटूंबीय निलेश चव्हाण याच्या घरी गेले असता निलेश चव्हाण याने कस्पटे कुटूंबीयावर रिव्हॉल्वर रोखली असा कस्पटे कुटूंबीयांनी आरोप केला आहे. या शिवाय बाळाची हेळसांड केल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाव समोर येताच निलेश चव्हाण पसार झाला होता.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार निलेश चव्हाण पुण्याहून रायगडला गेला, तिथून तो बायरोड दिल्लीला पोहोचला. दिल्लीला गेल्या नंतर तो बसने गोरखपूर (उत्तरप्रदेश) ला गेला. उत्तर प्रदेशमधून मग तो नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये गेला, त्यानंतर काठमांडू आणि त्या परिसरात राहून परत तो बॉर्डर ओलांडून इकडे येण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला भारताच्या हद्दीत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे हिची नणंद करिष्माचा मित्र आहे. हगवणे परिवारातील कौटूंबीक प्रकरणात निलेश चव्हाण याचा नेहमी हस्तक्षेप राहिल्याचेही समोर आले आहे.


निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीनेच अश्लील व्हिडीओ शूट केल्याचे आरोप केले आहेत. निलेशवर गुन्हे दाखल असताना त्याला शस्त्र परवाना कसा दिला? दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेशच्या अटकेची गरज होती. वैष्णवीचा घातपात झाला त्यावेळी निलेश त्य कटात सहभागी होता का? निलेश चव्हाण वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात वॉन्टेड म्हणून हवा होता त्याचे पोस्टरही पोलिस ठाण्यात लागले होते. ग्रामीण पोलिसांनी निलेश चव्हाण याचवा शस्त्र परवाना नाकारला होता. त्याला शस्त्र परवाना देण्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी शिफारस का केली? हगवणे कुटुंबीयांची सर्व दहशत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होती का? अशा अनेक प्रश्नांची उकल निलेश चव्हाण याच्या अटकेने होणार आहे. एखादा माणुस देशा बाहेर जाईपर्यंत पोलिस काय करतात? कोणाच्या वरदहस्ताने हे सुरू होतं हे आता समोर येणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.


निलेश चव्हाण याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथक तयार करण्यात आले होते. त्यातील एक टीम ही फिल्ड वर्क करणारी होती, दुसरी टीम तांत्रिक मदत करत होती. तर तिसरी टीम लोकल कॉर्डिनेशनसाठी बनवण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.निलेश चव्हाण हा शातीर अपराधी असून त्याने फरार कालावधीत स्वत:कडे कसल्याच प्रकारचे इलेक्टॉनिक उपकरण ठेवले नाही. अखेर आज पिंपरी-चिंचवड पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले. निलेश चव्हाण याच्या अटकेने हगवणे कुटुंबाच्या अडचणीत वाढ होणार आहे.


Commentaires


bottom of page