(व्हिडीओ) अंजनगावामधील पुतळ्याच्या वादाचा तोडगा निघणार! लक्ष्मण हाकेंना राज्यात दंगली घडवायच्यात - कुर्हाडे
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 3 min read
ओबीसी नेते हाकेंच्या भेटीनंतर गावात तणावपूर्ण शांतता; आमदार अभिजीत पाटलांवर जहरी टीका

सोलापूर: माढा तालुक्याच्या अंजनगावधील खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याबाबत गावात गेली दोन दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. पुतळ्याच्या वादाप्रकरणी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुतळा बसवलेल्या जागेची मोजणी करून ती जागा सरकारी असेल तर पुतळा आहे त्याठिकाणी ठेवण्यात येईल आणि जागा खेलोबा देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असेल तर पुतळा हटविण्यात येईल, असा तोडगा निघण्याचे संकेत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अंजनगावमध्ये बुधवारपासून तणावाची परिस्थिती आहे. दगडफेक आणि तहसीलदारांची गाडी उलथवून टाकण्यात आली होती. त्यामुळे अंजनगावमध्ये स्फोटक परिस्थिती होती. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजीत पाटीलयांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, दोन्ही बाजूंशी चर्चा केली असून आणखी काही लोकांशी चर्चा करणार आहे. प्रशासनाशी मी आता बोलत आहे. मी बुधवारी मुंबईत होतो, मी सकाळी माढ्यात आलो आहे. सकाळपासून मी सगळ्यांशी चर्चा करत आहे.
कोणतीही तेढ न निर्माण होता, कोणाच्याही भावना न दुखवता योग्य त्या पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन गावाला जे पाहिजे, जे आवश्यक आहे, त्यांचा भावनाचा आदर करून आम्ही त्यातून मार्ग काढू, असे आमदार अभिजीत पाटील म्हणाले.
दरम्यान, जागेची पार्श्वभूमी काय आहे, हे समजून घेत आहे. आम्ही सर्वानुमते योग्य तो तोडगा काढणे गरजेचे आहे. अंजनगावात शांतता निर्माण करणे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणे, हे महत्वाचे आहे. लक्ष्मण हाके यांनाही विनंती आहे की, आपण सगळेजण मिळून एकत्रितपणे यावर तोडगा काढूयात असंही आमदार अभिजीत पाटील म्हणाले.
जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजीत पाटील यांनी दोन्ही समाजाशी चर्चा केली आहे. पुतळा बसवलेली जागा कोणाची आहे. हे तपासले जाईल, ज्या जागेची मोजणीही करण्यात येणार आहे. जागा खेलोबा देवस्थानची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात येईल आणि जागा सरकारी मालकीची असेल तर पुतळा आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
सोलापूर पोलिसांकडू लक्ष्मण हाके सहकार्यांसह पंढरपूरमध्ये स्थानबद्ध: अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून काल दोन गट आमने समाने आले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिस कारवाईचा तमाम शिवप्रेमींकडून निषेध करण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज अंजनगावाकडे रवाना होत असताना दुपारी सोलापूर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या उद्देशाने लक्ष्मण हाके व त्यांच्या हकार्यांना पंढरपूरमध्ये स्थानबद्ध केले.
काय आहे पुतळ्याचा वाद: अंजनगाव येथील धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर ट्रस्टच्या मालकीच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीतून शिवप्रेमींनी बसवल्याचा आरोप एक गटाने केला आहे.
तर पुतळा बसवण्यात आलेली जागा शासकीय असून बसस्थानकाच्या समोर योग्य ठिकाणी पुतळा बसवण्यात आल्याचा दावा एका गटाकडून करण्यात येत आहे. यातच दोन्ही गट आमने समाने आल्याने काल पुतळा बसवल्यावरून वाद उफळला.
दरम्यान, काल पोलिस कारवाईत जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, यावेळी दगडफेकीचा आरोपही एका गटाकडून करण्यात येत आहे.
लक्ष्मण हाके घटनास्थळी: सोलापूर पोलिसांनी लक्ष्मण हाके, माऊली हाळनोर यांना सायंकाळी पंढरपूर येथून आंजनगाव येथे जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार लक्ष्मण हाके सायंकाळी सहकार्यांसमवेत अंजनगाव येथील घटनास्थळावर दाखल झाले.
आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आता माघार नाही: माऊली हाळनोर यांच्यासह इतर सहकार्यांसमवेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके घटनास्थळावर सायंकाळी दाखल झाले. यावेळी खेलोबा संस्थानचे परांडे बाबा यांची भेट घेवून शेकडो सहकार्यांसमवेत घटनास्थळावर ठिय्या मांडला. लक्ष्मण हाके यांनी बाहासाहेब आवारे पाटील यांच्यावर टीका करत आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आता माघार नाही’ म्हणत छत्रपींचे आम्ही मावळे आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला तोरणा किल्ला, स्वराज्याचं तोरणं बांधलेला तोरणा किल्ला,आमच्या धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगारानं छत्रपती शिवाजी महाराजंना गुलाल-बुक्कासारखा दान केला. छत्रपतींसाठी आम्ही जेव्हा जीव देत होतो, तेव्हा तुम्ही निजामाची गुलामी करत होते, मुख्यमंत्री महोदय तुमचं गृह खातं नेमकं काय करतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून आठरा पगडजातीच्या माणसांना लक्ष्य केलं जात आहे. तो कोण आवारे त्याचं नांव घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही तो आम्हाला शिव्या घालतोय.
लक्ष्मण हाकेंची आमदार अभिजीत पाटलांवर अश्लाघ्य टीका: यावेळी उपस्थितांना संबोधीत केले. लक्ष्मण हाके यांनी आमदार अभिजीत पाटलांवर टीका करताना म्हणाले की, ‘आरे अभिजीत पाटील...तुला लाज वाटली पाहिजे हारामखोर , लक्षात ठेव तुझ्या आमदारकीची मार्ग आमच्या वाडी वस्त्यांवरून जातो. ‘ बिरुबाची शपथ घेवून सांगतो... असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्यावर टीका केली.
राज्यातील तमाम धनगर बांधवांना अवाहन आहे की माढा तालुक्यातील अंजनगाव येथे येण्याचं अवाहन करत. गावगाड्यात आम्ही आहोत. महाराष्ट्र काय यांच्या बापाची जहागीरी नाही. गोळ्या घातल्या तरी चालतील पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उठणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा तर दिवसा बारा वाजता या दम असेल तर, कोण हरामखोर आवारे तुला सांगतो तु आग्या मोहोळाच्या पोळ्यात हात घातलास म्हणत हाके यांनी बाळासाहेब आवारे यांच्यावरही सडकून टीका केली.
पवन करवर, विष्णू कुर्हाडे यांची मध्यस्थी: अंजनगाव येथील पुुतळ्याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पवन करवर, विष्णू कुर्हाडे यांनी घटनास्थळी भेट देवून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत समन्वयाने तोडगा काढण्यासाठी संस्थानचे मठाधिपती परांडे महाराज, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेवून संवाद साधला.
हाकेंच्या भेटीत दोन्ही गटांकडून घोषणाबाजी: लक्ष्मण हाके अंजनगाव येथे येणार असल्याचे कळताच येथील शिवप्रेमी, मराठा समाज आक्रमक झाला होता. हाकेंना गावबंदी करा, त्याला गावात येऊ देवू नका. काल आम्ही पोलिस प्रशासनाचा लाठ्या-काठ्यांनी मार खाल्ला आहे. आता काही अनुचित प्रकार झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवप्रेमींनी दिला. मात्र, सायंकाळी हाके जमावाला संबोधीत करत असताना दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात येत होती त्यामुळे गावात आणखीच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



Comments