top of page

शहरातील पालखी मार्गाच्या हद्दीची विसंगती, पाणीपुरवठा योजनेच्या मुळावर?; महामार्ग प्रशासनाला शहरीकरणाचा विसर!, न्यायिक मागण्यांसाठी महिला पदाधिकार्‍यांचा आदोलनाचा इशारा


बीड: शिरुर शहरातून मार्गस्थ होणार्‍या पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे प्रगतीपथावर आहे. मार्ग प्रशासनाला शहर विस्तारीकणाचा विसर पडल्याने ग्रामीण प्रमाणेच शहरातून निमुळत्या हद्दीत कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. प्रगतीपथावरील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या कामास अडथळा निर्माण होणार असल्याने नगरपंचायतच्या बांधकाम सभापती सुनिता अक्षय रणखांब यांनी न्यायिक मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 


शिरुर शहरातून मार्गस्थ होणार्‍या राजूरी (नवगन)- चिंचपूर राज्य मार्ग क्रमांक 59 व पैठण-पंढरपूर पालखीमार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र (वारणी ग्रामपंचायत हद्द) ते जिजामाता चौक, पाटबंधारे कॅनल अंतर किमान 600 मिटर हद्दीतून एकत्रित मार्गस्थ होत आहेत. पालखी मार्गाची ग्रामीण हद्द 20 मिटरची हद्द कायम आहे. त्यानुसार शहरी भागासाठी हद्द निश्चित अधिक असणे अनिवार्य असताना पालखी मार्ग प्रशासनाने केवळ नाल्यांसाठी चार मिटर एवढीच अधिकची केली आहे. त्यामुळे भविष्यात दोन्ही मार्गाच्या एकत्रित वाहूतकीसाठी निमुळत्या रस्त्यामुळे वाहन चालकांसाठी ‘मौत का कुआ ’ बनणार आहे. कंत्राटार कंपनीच्या भल्यासाठी जबादार प्रशासनाने नागरिकांच्या रास्त मागण्यांकडे सोइस्कर कानाडोळा केल्याने संताप व्यक्त होत आहे.


दुसरीकडे शिरुर शहराचा कायमचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी 79 कोटी रुपयांची सिंदफणा मध्यम प्रकल्पातून प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. याच मार्गावरुन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे (खोदाई-गाडणे) काम नियोजित आहे. शहरीकरणातील प्रगतीपथावरील मार्गाचे कन्स्ट्रक्शनचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होणार आहे. आधिच हद्दीची विसंगती त्यात रस्त्याचे कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाची 12” (एकफूट) जलवाहीनी खोदण्याचे व गाडण्याचे काम रस्ता हद्द सोडून करणार कसे? रस्ता हद्दीतून कामाची नुकसान भरपाई कोण करणार? रस्ता हद्द वगळता जलवाहीनीच्या कामासाठी नगरपंचायत प्रशासनाला हद्दीचे कोडे सुटणार काय? असे अनेक प्रश्न ‘आ’ वासून आहेत.


रस्त्याच्या कन्स्ट्रक्शनमधून पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीचे काम करणे शक्य झाल्यास, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची नुकसान भरपाईचा आकडा कोटीत असणार आहे. वार्षीक बजेट लाखात असलेलं नगरपंचायत प्रशासन महामार्ग प्रशासनाची कोटीत नुकसान भरपाई देणार आहे का? नुकसान भरपाईसाठी दोन्ही प्रशासनाच्या वादात पालखीमार्गाला पुन्हा कायमची दुरावस्था सोसावी लागणार आहे.


पालखी मार्ग प्रशासनाने शहर विस्तारीकरणाच्या विचाराधीन राहून मार्गाची वाढीव हद्द निश्ति करावी, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहीनीच्या कामासाठी कन्स्ट्रक्शनची हद्द वगळून मार्कआऊट करणे क्रमप्राप्त आहे. यासह इतर समस्यांचे निवारण व शहरवासीयांच्या न्याय, हक्कासाठी नगरपंचायतच्या बांधकाम सभापती सुनिता अक्षय रणखांब यांनी जिजामाता चौकात आंदोलनाचा इशारा दिला आहे. जबाबदार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सभापती सुनिता अक्षय रणखांब यांनी तहसीलदार यांना पूर्वीच मागण्यांचे निवेदन दिले होते मात्र, निगरगठ्ठ, संवेदनाहीन, निष्क्रिय, नगारिकांच्या समस्यांचे सोयरसूतक नसलेल्या जबादार प्रशासनाने सोईस्कर कानाडोळा केला. झोपेचे सोंग घेणार्‍या प्रशासानाला सामान्यांच्या आर्त हाकेने जागे करण्यासाठी जिजामाता चौकात आयोजीत आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सभापती सुनिता रणखांब यांनी केले आहे.


प्रशासनाच्या निष्क्रियेतचा कळस : साधारणत:चार वर्षापूर्वी पालखी मार्गाच्या नालीच्या कन्स्ट्रक्शन कामात शिरुर शराला पाणीपुरवठा करणार्‍या महाजल योजनेची जलवाहिनी फुटली. प्रभाग क्रमांक 17 व 12 मधे पालखी मार्गाच्या कन्स्ट्रक्शन कामात जलवाहिनी नादूरुस्त झाल्याने प्रभागातील पाणीपुरवठा खंडीत झाला. तेव्हापासून आजतागायत पाणीपुरवठा खंडीत आहे. सातत्याने प्रभागाच्या विस्तारीत भागातील नागरिक नगरपंचायत कार्यालयात पाण्याची मागणीसाठी गेले असता ‘ पालखी मार्गाच्या कामात जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा खंडीत आहे. तुम्ही त्यांना (पालखी मार्ग प्रशासन)सांगा जलवाहिनी दुरुस्त करून द्यायची आम्ही सुरळीत पाणीपुरवठा करू’ असे उत्तर मिळत राहिले. मात्र, दोन्ही प्रशसनाच्या विसंगतीतून नागरिकांचा चार वर्षापासून घसा कोरडाच आहे.


शिरुरकरांना पाणी मागण्यासाठी छ.संभाजीनगरला जावे लागेल : सिंदफणा मध्यम प्रकल्पातून शहराकडे येणारी जलवाहिनी प्रभाग क्रमांक 17 व 12 मधून पालखी मार्गाच्या हद्दीतून प्रवाहित होणार आहे . आधिच हद्दीचा पेच त्यात कन्स्ट्रक्शनमधून जालवाहिनीचे काम केल्यास, भाविष्यात जलवाहिनीच्या दुरुस्ती अभावी शिरुरकरांना पाण्याच्या मागणीसाठी थेट राष्ट्रीय महामार्ग छत्रपती संंभाजीनगर विभागीय कार्यालय छ. संभाजीनगर गाठावे लागणार?

Comments


bottom of page