शासनाच्या मोफत धान्य वाटपास ई-पॉस मशिनचा खोडा!
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read
ई-पॉस मशिनमध्ये लाभार्थींच्या डाटामध्ये तांत्रीक अडचण! मोखाडा तालुक्यात हक्काच्या रेशन लाभापासून नागरिक वंचित

ई-पॉस मशिनमध्ये लाभार्थींची नावे (डेटा) मराठी मध्ये असल्याने नागरिकांच्या नमावोल्लेखास तांत्रिक अडचणी येत आहेत. मशिनमधील नामोल्लेख ग्राहकांच्या नावांशी जूळत नाही, त्यामुळे हक्काचा रेशनधान्याचा लाभही मिळत नाही आणि पावतीही मिळत नाही. ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील गरीब-गरजूंना हक्काच्या धान्य लाभापासून वंचित राहावे लागत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मोखाडा तालुक्यातील काही रेशन दुकानदारांकडील रेशन मशिनांमध्ये ग्राहकांचे नाव मराठीत असल्यामुळे ते सिस्टममध्ये तांत्रिक अडचण दाखवत असल्यामुळे ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही.तसेच ग्राहकांना खाद्यधान्य वितरणासाठी आवश्यक असलेली पावती मिळत नाही,ज्यामुळे ते रेशन दुकानावरून धान्य पुरवठा घेऊ शकत नाहीत.या समस्येमुळे गावातील अनेक गरजूंना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनीही या तक्रारीची नोंद घेतली असून,तंत्रज्ञांनी लवकरात लवकर यंत्रसामग्रीतील भाषा व डेटाबेसच्या सुसंगतीसाठी सुधारणा करणे गरजेचे आहे.काही भागांत तांत्रिक बदल करण्यात अधिक वेळ लागत असल्याने समस्या अद्याप कायम आहे. यामुळे ग्राहकांना रेशन वितरणात नियमित अडथळे येत आहेत,ज्यावर तातडीने तोडगा निघणे आवश्यक आहे. या घटनेमुळे गोरगरीब जनतेला होणारा परिणाम जास्त असल्याने सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून याकडे प्रशासनाने गंभीर दृष्टीकोन ठेवून त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.



Comments